• Download App
    भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे यांचे सडेतोड उत्तर.. Khupte tithe gupte program amol kolhe

    भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे यांचे सडेतोड उत्तर..

    ‘ खूपते तिथे गुप्ते ‘या कार्यक्रमात खासदारा अमोल कोल्हेचीं हजेरी. Khupte tithe gupte program amol kolhe

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकां नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून साकारणारे आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते, शिरूर मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे. सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

    दोन जुलै रोजी अजित पवार यांनी भाजपाशी मैत्री करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे ही उपस्थित होते . मात्र अवघ्या 24 तासातचं त्यांनी आपलं मत बदललं आणि “बाप नाही विसरायचा “. असं म्हणत त्यांनी शरद पवार गटाला आपला पाठिंबा दिला. मात्र अजूनही अमोल कोल्हे भाजपांच्या संपर्कात आहेत. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतात.

    आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर संसदेत प्रश्न उठवणारे आणि सभा गाजवणारे अमोल कोल्हे हे सध्या तरुण तडफदार आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. अमोल कोल्हे यांनी नुकतीचं झी मराठीवरील अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

    आणि अवधूत गुप्त यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर षटकार मारत अमोल कोल्हेंनी परखड आणि हजरजबाबी उत्तर दिलं. अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणाऱ्या बाबत लोक पैजा लावतात या प्रश्नावर कोल्हे यांनी परखड उत्तर दिलय . शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं उगाच नांगर खाद्यावर घेऊन चालणार नाही. आधी आभाळ बघून, मग जमीन कधी नांगरायची हे ठरवावं लागतं. पण हे राजकीय उत्तर आहे, पण खरं उत्तर हे आहे की….” या लाईनवरच प्रोमो कापण्यात आला आहे. त्यामुळं हा संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शित झाल्यावरच त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे कळू शकणार आहे.

    मी येतो तेव्हा लोकांना कळतं…दरम्यान, केईएमच्या मेडिकल कॉलेजच्या तुमच्या बॅचचं गेटटुगेदर नक्कीच होत असणार. यांपैकी बरेच जण चांगले डॉक्टर झालेले असतील पण त्यांचा ‘पर डे’ अर्थात दररोजचं मानधन जास्त असतं की तुमचं? या प्रश्नावरही कोल्हेंनी अगदी मार्मिक उत्तर दिलं आहे. पर डे त्यांचा जास्त असतो पण तेव्हा जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना आपलं व्हिजिटिंग कार्ड द्यावं लागतं. पण जेव्हा मी जातो तेव्हा मी येतोय हे लोकांना कळतं” असं त्यांनी प्रोमोमध्ये म्हटलं आहे.

    Khupte tithe gupte program amol kolhe

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा