विशेष प्रतिनिधी
बीड : एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. Khokya Bhosale
यात आश्चर्याची बाब, म्हणजे जो खोक्या भोसले काहीच दिवसांपूर्वी तब्बल २० गुन्ह्यांच्या आरोपांमुळे गजाआड गेला होता. त्याच खोक्याने कारागृहात गांजा मागवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता यातील चारही कैद्यांची वेगवेगळ्या तुरुंगात उचलबांगडी करण्यात आली आहे.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ च्या सुमारास,बीड पोलीस स्टेशनमधले सुभेदार बलभीम चिचाणे आणि हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज यांना ७ नंबरच्या बराकमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानुसार त्यांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिंटू मिठ्ठू गायकवाडची झडती घेतली. तेव्हा त्याच्या कपड्यांमध्ये एक चिरलेला रबरी बॉल सापडला आणि त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ देखील आढळला. एवढंच नाही, तर तेव्हा त्याच्या पँटच्या खिशात हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थसदृश मुद्देमाल सापडला. Khokya Bhosale
त्यानंतर पोलिसांनी तो सगळा मुद्देमाल जप्त केला व नायब तहसीलदारांसमक्ष पंचनामा करून ४६ ग्राम वजनाचा, ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी, चारही आरोपींवर गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
खोक्या भोसलेसह हे चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून या चारही कैद्यांची रवानगी दुसऱ्या कारागृहांमध्ये करण्यात आली आहे. यातील खोक्या भोसले याला संभाजीनगरच्या हार्सूल कारागृहात पाठवण्यात आले आहे. तर शाम पवार याला जालना, यमराज राठोड याला धाराशिव, मोहसिन खान याला परभणी येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गजानन क्षीरसागर हे करत आहेत. त्यांनी आता कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी चौघांचा ताबा मिळण्याकरिता न्यायालयात अर्जसुध्दा दाखल केलेला आहे.
Khokya Bhosale will now be sent to Harsul Jail
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी खर्गेंची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांना भोवणार शकुन राणी प्रकरण, निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करण्याचे निर्देश
- American Soldier : रशियासाठी लढणाऱ्या अमेरिकन सैनिकाला पदक; गतवर्षी युक्रेनमध्ये हत्या; आई अमेरिकन गुप्तचर संस्था CIAची उपसंचालक
- Iran Deports : इराण अफगाण निर्वासितांना तपासणीशिवाय बाहेर काढतोय; मुलांना कुटुंबांपासून वेगळे केले, 100 दिवसांत 10 लाख स्थलांतरित