विशेष प्रतिनिधी
पुणे : Khadse Son-in-Law रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे. खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी ससून रूग्णालयाने आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस पुढे काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. दरम्यान, पुणे पोलिसांनी खेवलकर यांचा अहवाल त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रोहिणी यांनी माध्यमांकडे मदत मागितली आहे.Khadse Son-in-Law
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे रोहिणी यांच्यासह त्यांचे वडील एकनाथ खडसे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विशेषतः खडसे यांनी कथित हनी ट्रॅप प्रकरणी भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची कोंडी केली असताना ही घटना घडल्यामुळे यामागे काही षडयंत्र आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ससून रूग्णालयाचा प्रांजल यांच्या वैद्यकीय तपासणी अहवाल आला आहे.Khadse Son-in-Law
प्रांजल खेवलकर यांनी अल्कोहोल घेतले
पुणे पोलिसांनी खराडी ड्रग्ज प्रकरणी 5 पुरुष व 2 महिला अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात 7 पैकी 2 जणांनी अल्होहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्कोहोल सेवन करणाऱ्यांत प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. याशिवाय श्रीपाद मोहन यादव नामक आरोपीनेही अल्कोहोलचे सेवन केले आहे. आता पुढील तपासणीसाठी आरोपींच्या रक्ताचे व लघवीचे नमुणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. त्याचा अहवाल 4-6 दिवसांत येण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर या आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? हे स्पष्ट होणार आहे.
पोलिसांचा रोहिणी खडसेंना अहवाल देण्यास विरोध
दुसरीकडे, प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी पोलिसांनी आपल्याला ससून रुग्णालयाचा अहवाल देण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. त्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या, डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल ससून रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे अशा बातम्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जात आहेत. कुटुंब म्हणून आम्हाला तो अहवाल अजून प्राप्त झाला नाही पण माध्यम प्रतिनिधींना तो अहवाल मिळाला आहे.
आम्हाला तो अहवाल मिळावा यासाठी आम्ही पोलिसांकडे मागणी केली तर आम्हाला अहवाल थेट कोर्टात सादर केला जाणार आहे असे सांगितले जात आहे. सध्या तो अहवाल माध्यम प्रतिनिधींना मिळाला आहे असे आम्ही वृत्तवाहिनींमध्ये पाहत आहोत. माझी माध्यम प्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की आपल्याला मिळालेला अहवाल आम्हाला द्यावा. जेणेकरून आम्हाला आमची बाजू मांडण्यास अहवाल उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या.
घटनास्थळी सापडले अंमली पदार्थ
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती. पोलिसांच्या छापेमारीत घटनास्थळी दारू व हुक्का, कोकेनसह इतर अंमली पदार्थ आढळले. याशिवाय एक लॅपटॉप, तीन पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क व इतर महत्त्वाचे दस्तऐवजही या कारवाईत जप्त करण्यात आलेत. खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमधील 101 व 102 क्रमांकाची खोली प्रांजल यांच्या नावाने बूक करण्यात आली होती. या खोल्यांचे भङाडे 2800 व 10357 रुपये एवढे होते. या दोन्ही खोल्या 25 ते 28 जुलैपर्यंत आरक्षित करण्यात आल्या होत्या.
रोहिणी खडसेंची पोलिस आयुक्तांसोबतची भेट रद्द
दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबतची भेट रद्द झाली आहे. त्या प्रांजल खेवलकर यांच्यावरील कारवाईविषयी सीपींशी चर्चा करणार होत्या. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार व शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापही सीपींकडे जाणार होते. रोहित पवार यांच्या पीएने ही भेट नक्की केली होती. पण रोहिणी खडसे विहित वेळेत पोहोचल्या नाही. त्यानंतर अमितेश कुमार यांनी ही भेट रद्द केली.
कायदा अन् पोलिसांवर पूर्ण विश्वास – रोहिणी खडसे
प्रांजल यांच्या अटकेनंतर जवळपास 24 तासांनंतर रोहिणी खडसे यांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली आहे. कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्यवेळी सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या प्रकरणामागे राजकीय कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी दिव्याखाली अंधार अशा प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Khadse Son-in-Law Alcohol Consumption Party Report
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह 3 दहशतवादी ठार; ऑपरेशन महादेवअंतर्गत कारवाई
- DR Congo : पूर्व DR काँगोमध्ये चर्चवर दहशतवादी हल्ला, 38 मृत्यू; लोक प्रार्थना सभेला उपस्थित होते
- ज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही, ते मोदी सरकारला विचारताहेत तुम्ही आणखी पुढे का गेला नाहीत??; परराष्ट्र मंत्र्यांचा लोकसभेत हल्लाबोल
- Turkey : तुर्कीने दोन सर्वात शक्तिशाली बॉम्बची चाचणी घेतली; 970 किलो वजनाचे GAZAP आणि NEB-2 घोस्ट बॉम्ब