• Download App
    Khadse Criticizes BJP Badgujar Salim Kutta पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती;

    Eknath Khadse : पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती; सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरलाही घेतले, खडसेंची टीका

    Eknath Khadse

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Khadse  शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली. सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई ब्लास्टमधील आरोपी सलीम कुत्तासोबतचे फोटो भाजप नेते नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी समोर आणले होते तसेच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची देखील घोषणा केली होती. परंतु तेच आता भाजपमध्ये गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.Eknath Khadse

    पंढरपूर येथे एकनाथ खडसे यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती. आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले हे अति झाले.



    ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, ते आज पक्षात असून 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज यांच्यासोबत आहेत, असा देखील टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला असून मी अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

    भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का असे विचारले असता खडसेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चीट देत यासाठी त्यांना एकट्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार आहेत. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता, मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, अशी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

    गिरीश महाजन यांचा पलटवार

    सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश झाल्यावर एकनाथ खडसे म्हणाले होते त्यापेक्षा मी वाईट नाही, मला का घेत नाहीत. खडसे पक्षात येण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसते, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, मी लहान कार्यकर्ता आहे, ते दिल्लीत बोलले, त्यांचे कनेक्शन दिल्लीत आहे. मी त्यांच्याबद्दल काही टिपणी करणार नाही, कारण ते राष्ट्रीय नेते आहेत. दिल्लीत त्यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, त्याचे फोटो समोर आले नाहीत, असा टोलाही लगावला.

    Khadse Criticizes BJP Badgujar Salim Kutta

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat : खरात प्रकरणात पोलिस आयजींचं नाव समोर; अंजली दमानियांचा व्हिडीओतून गंभीर आरोप

    Prakash Ambedkar : SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका; जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा दावा

    Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या