• Download App
    केतकी चितळे ट्विट : नॉटीने मोदींना काल लै लोणी लावले, पण काही कामी नाही आले!! Ketaki Chitale Tweet : Naughty buttered Modi yesterday, but nothing worked!!

    केतकी चितळे ट्विट : नॉटीने मोदींना काल लै लोणी लावले, पण काही कामी नाही आले!!

    प्रतिनिधी

    मुंबई : “नॉटीने मोदीजी को कल बहुत मक्खन लगाया लेकिन कुछ काम नही आया”, हे ट्विट आहे, अभिनेत्री केतकी चितळे हिचे!! पवारांसंदर्भातील ट्विट मुळे चर्चेत आलेल्या आणि तब्बल 42 दिवसांची पोलिस आणि न्यायालयीन कोठडी भोगलेल्या केतकी चितळेने पुन्हा एकदा ट्विटरवर आपले राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे!! Ketaki Chitale Tweet : Naughty buttered Modi yesterday, but nothing worked!!

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अटकेनंतर केतकीने आपल्या ट्विटर हँडल वरून संजय राऊत यांची एक मुलाखत ट्विट केली आहे. या मुलाखतीत संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची अफाट स्तुती करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मोदी आणि ठाकरे परिवार यांचा कसा जुना संबंध आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात कसे इमोशनल नाते आहे, याचे बहारदार वर्णन करताना दिसत आहेत.



    इतकेच नाही तर संजय राऊत यांनी मोदींना भाजपचे श्रीकृष्ण असेही म्हटले आहे. भाजपचे राजकीय अस्तित्व आणि आजचा विस्तार जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे घडला आहे, पंतप्रधान मोदी हे भाजप साठी आवश्यक आहेत तसेच शिवसेनेसाठी ठाकरे आवश्यक आहेत. मोदींच्या नेतृत्वाला आम्ही मानतो असे ते म्हणाले आहेत. परंतु, संजय राऊत यांच्या या अफाट मोदी स्तुतीचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांना ईडीने अटक केलीच, असा चिमटा काढणारे ट्विट केतकी चितळे हिने केलेले दिसत आहे.

    Ketaki Chitale Tweet : Naughty buttered Modi yesterday, but nothing worked!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !