• Download App
    ‘’…यालाच दंश करणे, दुष्टपणा करणे असे म्हणतात’’ केशव उपाध्येंचे संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर! Keshav Upadhye response to Sanjay Rauts criticism of BJP and PM Modi

    ‘’…यालाच दंश करणे, दुष्टपणा करणे असे म्हणतात’’ केशव उपाध्येंचे संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर!

    (संग्रहित छायाचित्र)

    संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपा व पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना, अपशब्द वापरल्याने राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवाय, भाजपानेही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान वातावरण पाहून मल्लिकार्जुन खरगेंनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊन, सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. असे असताना ठाकरे गटाचे खासदार आणि सदैव वादाच्या केंद्रस्थानी दिसणारे संजय राऊत यांनी त्यांच्या सामान दैनिकातून भाजपा व पंतप्रधान मोदींवर टीका करताना मर्यादा सोडली. ज्यावर आता भाजपानेही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Keshav Upadhye response to Sanjay Rauts criticism of BJP and PM Modi

    भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, ‘’संजय राऊत महाराष्ट्रात सापाच्या पिल्लाला ३० वर्षं दूध पाजलं म्हणता, विषारी म्हणता, भाजपाच्या जीवावर मोठे झालात. मोदींच्या नावाने मत मागताना हे आठवलं नाही का? मोदींजीच्या नावाने मतं मागितली आणि निवडून आल्यावर पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणे, दुष्टपणा करणे असे म्हणतात.’’

    याचबरोबर ‘’भाजपा आणि मोदींना जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिलं आहे. काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण ते पडण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे समर्थन करू नका, काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागितली आहे, तुम्ही तेवढे संवेदनशील नाहीत याची जाणीव आहे.’’ असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    संजय राऊतांनी अग्रलेखातून काय म्हटले आहे? –

    ‘’भाजपच्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपाने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आम्हीही ३० वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे.’’

    तसेच, ‘’जेव्हा आपला जीव धोक्यात असतो तेव्हाच साप चावतो. पण दुष्ट माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करत असतो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेच पाहिजे. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असंच खरगे यांना म्हणायचे आहे.’’ असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    Keshav Upadhye response to Sanjay Rauts criticism of BJP and PM Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा