संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांचाही केला आहे उल्लेख, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. त्यांनी शिंदे यांना मख्खमंत्री म्हटलं आहे. यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. Keshav Upadhye responds to Sanjay Raut criticism of Chief Minister Eknath Shinde
‘’कोण मुख्यमंत्री आणि कोण मख्खमंत्री हे संपूर्ण राज्याला माहिती बरं का संजय राऊत. तुमचे उद्धव ठाकरे मख्खमंत्री अडीच वर्ष राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून घरात बसून होते आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेमध्ये सहज मिसळून कामं करत आहेत हे जनता बघत आहे.’’ असं केशव उपाध्ये ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –
‘’या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्खमंत्री आहेत. मुख्यमंत्री असते, तर राज्याची अशी अवस्था झाली नसती. सगळी सूत्रं सध्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत, बाकी काही करत नाहीयेत.” अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईडी’ची नऊ ठिकाणी छापेमारी!
याशिवाय मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी राज्यातील सध्याच्या विविध आंदोलनांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. ‘’राज्यात सध्या अस्वस्थता, खदखद आहे. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. लोक खूश नाहीत. त्याकडं फडणवीसांनी लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रातील खरे सूत्रधार तेच आहेत.’’ असं म्हटलं.
Keshav Upadhye responds to Sanjay Raut criticism of Chief Minister Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- CJI म्हणाले- कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्या अयोग्य लैंगिक शब्दांवर बंदी घालण्यात येईल, नवीन शब्दकोश लवकरच येणार
- अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??
- Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!
- योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!