• Download App
    केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार ! ; मंदिरे खुली होणार; २२ कारखान्यांना मिळणार नवसंजीवनीKem's kumkum will laugh again! ; The temples will be open; Revival of 22 factories

    केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार ! ; मंदिरे खुली होणार; २२ कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून बंद असलेली महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळ उद्यापासून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर खुली होणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार आहे. Kem’s kumkum will laugh again! ; The temples will be open; Revival of 22 factories

    कोरोना संकटामुळे केमची कुंकवाची कारखानदारी संकटात सापडली होती. यामुळे तब्बल ४०० कामगारांवर बेकरीची कुऱ्हाड कोसळली होती. आता मंदिरे उद्यापासून खुली होणार आहेत. आता व्यवसायाला पुन्हा सुरुवात होत आहे. त्यामुळे केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार आहे.  सौभाग्याच लेणं म्हणून कुंकवाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.

    सोलापूर जिल्ह्यातील केममध्ये कुंकवाचे २२ कारखाने आहेत. कोरोनामुळे सर्व कारखाने बंद होते. कामगारांच्या रोजीरोटीवर प्रश्ननिर्माण झाला होता.

    दर्जेदार मालामुळे सिझनमध्ये केममधून ८०० मेट्रिक टन गुलाल अन् कुंकू निर्यात केला जात होता. देवदेवतांच्या यात्रा उत्सवात कुंकू, गुलाल, बुक्का वापरण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. ती खंडित झाली होती.
    कोरोनामुळे पंढरपूरची वारी,तुळजापूर – कोल्हापूरचा नवरात्रोत्सव, खंडोबा – ज्योतिबाच्या यात्रा, खेडोपाडी गावोगावचे उरूस, जत्रा, यात्रा, गणपती या सर्वांवर निर्बंध आल्याने कुंकवाचे कारखाने ठप्प झाले होते. आता व्यवहार सुरळीत सुरु होत असल्याने व्यवसायाला उभारी येईल, असा विश्वास कारखानदारांनी व्यक्त केला आहे.

    – केमची कुंकवाची कारखानदारी संकटात होती

    – सोलापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कारखानदारी

    – कुंकवाचे तब्बल २२ कारखाने या भागात आहेत

    – कोरोनाने सौभाग्य लेण्याचा बाजार होता ठप्प

    – ४०० कामगारांवर आली होती उपासमारीची वेळ

    — घटस्थापनेला मंदिरे खुली होणार असल्याने दिलासा

    Kem’s kumkum will laugh again! ; The temples will be open; Revival of 22 factories

     

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य