प्रतिनिधी
नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते एसीआर चंद्रशेखर राव यांचा केंद्रातील मोदी सरकारला प्रचंड विरोध आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या तेलंगण राष्ट्र समितीचे रूपांतर भारत राष्ट्र समितीत करून पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण हे करताना महाराष्ट्रात येण्यासाठी मात्र चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला निवडला आहे. KCR Chandrasekhar Rao targets BJP from the stronghold of Chavan loyal to Congress in Nanded
चंद्रशेखर राव यांनी आज तेलंगण बाहेर भारत राष्ट्र समितीची ही पहिली सभा घेतली, ती महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये. नांदेड हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यातून चंद्रशेखर राव यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोदी सरकारने मेक इन इंडियाची घोषणा केली पण तिचे रूपांतर जोक इन इंडियात झाले आहे. कारण देशातल्या गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये, गल्ल्या गल्ल्यांमध्ये आता चिनी वस्तूंचे बाजार भरत आहेत, असे टीकास्त्र चंद्रशेखर राव यांनी सोडले.
पण त्याचवेळी नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांनी मुद्दाम आणीबाणीचा उल्लेख केला. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये देशावर लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी आवाज बुलंद केला. शेतकऱ्याला जागे केले आणि शेतकऱ्याने त्या वेळच्या सरकारवर नांगर फिरवला, असे टीकास्त्र चंद्रशेखरराव यांनी सोडले.
चंद्रशेखर राव यांनी जयप्रकाश नारायण यांची आठवण नांदेड मध्ये काढणे, याला विशेष महत्त्व आहे. कारण त्यावेळी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींची सत्ता केंद्रात, तर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची सत्ता महाराष्ट्रात अशी राजकीय परिस्थिती होती. त्याच शंकरराव चव्हाण यांच्या गावात म्हणजे नांदेडमध्ये येऊन भले चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले असेल, पण प्रत्यक्षात आणीबाणीची आठवण काढून त्यांनी काँग्रेसशी निष्ठावान असलेल्या चव्हाण कुटुंबीयांना आणि काँग्रेसलाच डिवचले आहे.
KCR Chandrasekhar Rao targets BJP from the stronghold of Chavan loyal to Congress in Nanded
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस – राष्ट्रवादी हे कसले धर्मनिरपेक्ष पक्ष?, त्यांनी फक्त मुसलमानांची मते घेतली; खासदार इम्तियाज जलील यांचे शरसंधान
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची 7 महिन्यांत 3600 रुग्णांना 28.32 कोटींची मदत; यादीत नव्या आजारांचाही समावेश
- आसाम मध्ये बालविवाहा विरोधात सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; 2258 लोकांना अटक; ओवेसी – अजमलांचा सरकार विरोधी आवाज