• Download App
    Kbc ला मिळणार या पर्वाचा पहिला करोडपती! 21 वर्षांचा जसकरण ठरवणार आपलं भवितव्य!KBC News jaskar become a winner

    KBC ला मिळणार या पर्वाचा पहिला करोडपती! 21 वर्षांचा जसकरण सिंह ठरवणार आपलं भवितव्य!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : छोट्या पडदा वरील कोण बनेगा करोडपती हा शो केली पंधरा वर्षे रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा सूत्रसंचालन या शोला चार चांद लावून जातं. अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण असलेला हा शो संपूर्ण कुटुंबासोबत बघितला जातो.  देशभरात या शोचे अनेक चाहते आहेत.KBC News jaskar become a winner

    यंदाच या शोचं हे पांढरावं पर्व आहे.हा सिझन 14 ऑगस्ट 2023 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आत्ता या शोला सुरु होऊन बरेच दिवस झाले असून आत्तापर्यंत या शो मध्ये आपण अनेक स्पर्धक पाहिलेत ज्यांनी चांगली कामगिरी करत पैसे जिंकले.मात्र अत्तापर्यंत या सिझनमध्ये कोणताही स्पर्धक करोडपती होऊ शकला नाही. त्यापुर्वीच त्यांचा प्रवास संपला.

    एक कोटीचा प्रश्न आल्यानंतर अनेक स्पर्धकांनी त्यांचा खेळ तिथेच थांबवला. पण आता शोच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती आता मिळणार आहे.’कौन बनेगा करोडपती’ च्या निर्मात्यांनी याचा प्रोमो सोशल मीडियावर शेयर केला आहे. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या प्रोमोत पंजाबमधील स्पर्धक जसकरण सिंगने 1 कोटींची रक्कम जिंकली आहे. आता जसकरण पुढिल प्रश्नाचे उत्तर देत सात कोटी पर्यंतची रक्कम जिंकतो की नाही हे पहावं लागेल.

    सोनी टीव्हीने दाखवलेल्या प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन हे आपल्या जागेवरून उभे राहतात आणि जसकरणने एक कोटी रुपये जिंकल्याची घोषणा केली. घोषणा करताच ते त्याला जाऊन मिठी मारतात.21 वर्षीय जसकरण हा अती सामान्य घरातला आहे. तो युपीएससीची तयार करतोय. पुढच्या वर्षी तो पहिल्यांदाच पेपर देणार आहे. ही त्याची पहिली कमाई आहे.

    KBC News jaskar become a winner

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!