वृत्तसंस्था
पुणे – ४३ वर्षांपूर्वी केबी, छोटू आणि मनोज हे वेगवेगळ्या शहरांमधले विद्यार्थी एकत्र आले. त्यांचे शिक्षण झाले. ते पांगले आणि आज पुन्हा एकत्र आलेत. कोण आहेत हे केबी, छोटू आणि मनोज… हे आहेत… सध्याच्या भारतीय सैन्य दलांचे तीन प्रमुख… भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग, भारतीय हवाई दल प्रमुख एस. के भदौरिया आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे…!!KB, Chhotu and Manoj came together again after 43 years … when … where … how … ??
अवघ्या १७ वर्षांचे असताना हे तीन युवक केबी, छोटू आणि मनोज या नावाने पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले. ३ वर्षांचे खडतर परिश्रम करून कठीण परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आणि भारतीय सैन्य दलांच्या तीनही विंगमध्ये अधिकार पदावर पोहोचले.
आज हेच तीन जण भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग, भारतीय हवाई दल प्रमुख एस. के भदौरिया आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे…!! या नावांनी आणि पदांनी देशभरच नव्हे, तर जगभर ओळखले जातात.
१९७६ मध्ये ५६ व्या कोर्ससाठी हे तिघेजण पुण्यातील खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले. १९८० च्या जुलै महिन्यात पासआऊट झाले. नौदल, हवाई दल आणि पायदळात त्यांनी विविध अधिकार पदांवर कामे केली. सध्या ते आपापल्या दलांचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
२० आणि २१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५६ व्या कोर्सच्या छात्रांचे गेट टुगेदर प्रबोधिनीत आयोजित करण्यात आले आहे. याला हे तीनही सर्वोच्च अधिकारी अत्यंत अभिमानपूर्वक हजर आहेत. भारतीय सैन्य दलांच्या देदिप्यमान इतिहासाचे आणि वर्तमानाचे ते नुसते साक्षीदार नाहीत, तर निर्मातेही आहेत.
या तीनही सर्वोच्च अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या छात्रांशी आपले जुने अनुभव शेअर केले त्याच बरोबर नवीन आव्हानांचा मुकाबला करण्याचेही बाळकडू दिले. प्रबोधिनीतल्या छात्रांना या आपल्या सिनिअर छात्रांकडून रॅगिंगचा तर अनुभव आला नाही, उलट तीनही सेनादलांच्या प्रमुखांना एकत्र भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
KB, Chhotu and Manoj came together again after 43 years … when … where … how … ??