आता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. याठिकाणी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादीविरोधात मैदानात आहेत. Kavathe Mahankal MNC Elections Rohit Pawar Crticizing Opposions
प्रतिनिधी
सांगली : आता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. याठिकाणी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादीविरोधात मैदानात आहेत.
कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक सध्या पार पडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी विश्वासात न घेता भाजपशी आघाडी केल्याने या ठिकाणी ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडी, अशी होत आहे.
या निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा शुभारंभ बुधवारी पार पडला, यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ शहरातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर आयोजित प्रचार सभेमध्ये अनेक नेत्यांनी पंचवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं मत व्यक्त केलं. हा धागा पकडत रोहित पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना, आपण सगळ्यांनी सांगितले 25 वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत, पण आता माझं वय 23 आहे आणि 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, याची खात्री देतो, असा गर्भित इशारा आपल्या विरोधकांना दिला आहे.
Kavathe Mahankal MNC Elections Rohit Pawar Crticizing Opposions
महत्त्वाच्या बातम्या
- STORY BEHIND SAMNA EDITORIAL : आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …
- हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने