• Download App
    गुंतवणूकदारांची चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक, मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ आणि मंजिरी मराठे यांना अटक Kaustubh and Manjiri Marathe of Maratha Jewelers arrested for cheating investors

    गुंतवणूकदारांची चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक, मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ आणि मंजिरी मराठे यांना अटक

    गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे मंजिरी आणि कौस्तुभ मराठे या पती पत्नीला अटक केली आहे. Kaustubh and Manjiri Marathe of Maratha Jewelers arrested for cheating investors


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे मंजिरी आणि कौस्तुभ मराठे या पती पत्नीला अटक केली आहे.

    गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम व सोने चांदी स्वरूपात घेतलेल्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक केली. यापूर्वी प्रणव मिलिंद मराठे (वय 26, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे ) याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आत्महत्या केलेले मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे यांनी फिर्याद दिली आहे.

    मराठे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड तसेच पौड रोड येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींनी गुंतवणूकदारांना मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. कुटे यांच्यासह 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी 21 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसानी आरोपी तपासात सहकार्यही करीत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

    मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या.
    ठेवीदारांना स्वत:च्या हस्ताक्षरात दिलेल्या ठेव पावतीवरील आरोपींच्या हस्तक्षराचे नमुने घ्यायचे असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. आरोपी देशाबाहेर जाण्याची तसेच साक्षीदारांना धमकाविण्याची शक्यता आहे. मराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीच्या आरोपी संचालकांनी कॉसमॉस बँकेच्या स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

    Kaustubh and Manjiri Marathe of Maratha Jewelers arrested for cheating investors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!