• Download App
    पोटनिवडणुकीचा निष्कर्ष : कसबा व्हाया गोरखपूर, उंदीर पोखरून डोंगर!!Kasba byelection 2023 a lesson for BJP as it was in gorakhpur byelection in 2018

    पोटनिवडणुकीचा निष्कर्ष : कसबा व्हाया गोरखपूर, उंदीर पोखरून डोंगर!!

    विशेष प्रतिनिधी

    कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून निवडून आले आणि मराठी माध्यमांनी राजकीय विश्लेषकांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी “उंदीर पोखरून डोंगरा”एवढे निष्कर्ष काढले!! Kasba byelection 2023 a lesson for BJP as it was in gorakhpur byelection in 2018

    आता मूळात “डोंगर पोखरून उंदीर काढणे” ही मराठी म्हण आहे. पण कसब्याच्या पोटनिवडणुकीत मात्र ही मराठी म्हण नेमकी उलटी ठरली आहे. कारण कसबा हा मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 1 मतदारसंघ आहे आणि तिथल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून महाविकास आघाडीचे नेते, मराठी माध्यमे आणि राजकीय विश्लेषक संपूर्ण महाराष्ट्राच्या निकालाचा निष्कर्ष काढत आहेत!! या अर्थाने कसब्याचा उंदीर पोखरून महाराष्ट्राचा निकाल कसा लागेल??, याचा डोंगर उभा केला जात आहे!!

    वास्तविक प्रत्येक पोटनिवडणूक अथवा निवडणूक ही स्वतंत्र असते. प्रत्येक मतदारसंघाची वैशिष्ट्ये, त्यातला मतदान पॅटर्न हा स्वतंत्र असू शकतो. कसब्यात जे घडले ते महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेच, ते नाकारण्यात मतलब नाही. पण त्यातून लगेच महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरोधी सुप्त लाट आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतराविरोधात जनतेमध्ये रोष आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांची कसबा पोटनिवडणूक ही झलक आहे, असे म्हणणे फार म्हणजे फारच धारिष्ट्याचे आहे!! किंबहुना महाराष्ट्रात शरद पवारांना जो नॅरेटिव्ह सेट करायचा आहे, तोच नॅरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीने मराठी माध्यमांनी चिंचवड मध्ये भाजपच्या विजयापेक्षा कसब्यातला पोटनिवडणुकीतला पराभव हा केंद्रस्थानी ठेवून रिपोर्टिंग चालविले आहे.

    – गोरखपूरची पोटनिवडणूक

    पण या निमित्ताने 2018 ची गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आठवली. कसब्यामध्ये जसे 1995 नंतर सातत्याने भाजपचे गिरीश बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक निवडून येत होते तसेच गोरखपूर मधून योगी आदित्यनाथ हे लोकसभेत खासदार म्हणून निवडून येत होते. 2017 मध्ये ते मुख्यमंत्री बनले आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. 14 मार्च 2018 रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि तिथे भाजपचा धक्कादायक पराभव झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीण निषाद यांनी भाजपचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१९६१ मतांनी पराभव केला होता. गोरखपूर सारखा भाजपचा बालेकिल्ला, त्यातही योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर वर्षभरातच कोसळला होता. भाजपला त्या निवडणुकीत प्रचंड धक्का बसणे स्वाभाविक होते. त्यावेळी देखील उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची लाट आहे. भाजपचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड पराभव होईल, असेच निष्कर्ष काढले गेले होते.

    पण भाजपचा त्यावेळी झालेला पराभव आणि कोसळलेला बालेकिल्ला सव्वा वर्षच “टिकला”. 2019 च्या निवडणुकीत भाजपने गोरखपूरचा बालेकिल्ला पुन्हा बांधून काढला. लोकसभेची ती जागा पुन्हा खेचून आणली. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 303 जागा निवडून आणल्या. 2018 चा गोरखपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समाजवादी पक्षाने तयार केलेला सगळा नॅरेटिव्ह आणि निष्कर्ष 2019 मध्ये पूर्ण वाहून गेला.

    कसबा आणि गोरखपूर मतदारसंघांमध्ये याबाबतीत विलक्षण साम्य असू शकते. कसब्यात उल्हास काळोखे, तात्या थोरात यांच्यानंतर रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा झेंडा रोवला आहे, हे निश्चितच. रवींद्र धंगेकरांचे वैयक्तिक उमेदवार म्हणून मोठे यश आहे, यातही शंका नाही. पण म्हणून लगेच त्यातून आता महाराष्ट्रात भाजप विरोधी सुप्त लाट आहे आणि 2024 च्या निवडणुकीमध्ये या लाटेत भाजप वाहून जाणार आहे, असा निष्कर्ष काढणे हा फक्त आणि फक्त “पवार नॅरेटिव्ह” सेट करण्याचाच भाग आहे.

    गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने हा धडा भाजपला 2018 मध्ये शिकवला होता, तोच 2023 च्या पोटनिवडणुकीत कसब्याने दिला आहे, हेच फार तर कसबा पोटनिवडणुकीच्या निष्कर्षातून अथवा विश्लेषणातून म्हणता येईल!!

    Kasba byelection 2023 a lesson for BJP as it was in gorakhpur byelection in 2018

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस