• Download App
    पाकिस्तानी माजी मंत्री फवादचे राहुल गांधींसाठी ट्विट; वडेट्टीवारांची पाकिस्तान + कसाबला क्लीन चीट!! Kasab didn’t kill Karkare. He’s now giving Kasab & Pakistan a clean chit.

    पाकिस्तानी माजी मंत्री फवादचे राहुल गांधींसाठी ट्विट; वडेट्टीवारांची पाकिस्तान + कसाबला क्लीन चीट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पाकिस्तानचा माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारतात राहुल गांधी जिंकावेत, मोदी हरावेत, यासाठी ट्विट केले त्यावरून भारतासह पाकिस्तानातही मोठा गदारोळ उठला, पण त्या पाठोपाठ काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम महाराष्ट्रातूनही उफाळून वर आले. Kasab didn’t kill Karkare. He’s now giving Kasab & Pakistan a clean chit.

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ वकील आणि भाजपचे उत्तर मध्य मतदार संघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवताना पाकिस्तान आणि दहशतवादी अजमल कसाब यांना मुंबई हल्ल्यातून क्लीन चीट दिली.

    पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाब किंवा अन्य कुठल्या दहशतवाद्यांच्या बंदुकीतली नव्हती, तर संघ समर्पित एका पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली होती आणि त्याचे पुरावे उज्ज्वल निकम यांनी लपवले त्यामुळे ते देशद्रोही ठरतात. अशा देशद्रोही व्यक्तीला लोकसभा निवडणुकीतले तिकीट देऊन भाजप देशद्रोहाला चिथावणी देतो आहे का??, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

    पण आपण आपल्या वक्तव्यातून उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वरिष्ठ वकिलाला देशद्रोही ठरवतो आहोत, पण त्याचवेळी पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्राला आणि अजमल कसाब सारख्या मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्याला क्लीन चीट देत आहोत, याचे भानही विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला राहिले नाही.

    एकीकडे इम्रान खान सरकार मधला पाकिस्तानचा माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन याने भारताच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा विजय व्हावा, अशी कामना करणारे ट्विट केले. त्यावरून भारतात आणि पाकिस्तानातही मोठा गदारोळ उठला. मोदींच्या पराभवाने आणि राहुल गांधींच्या विजयाने नेमका कोणाला आनंद होणार आहे??, असा सवाल सोशल मीडियावर विचारला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या सगळ्या प्रकाराची दखल आपल्या जाहीर भाषणात घेतली. मोदींना हरवण्यासाठी कोण कोणाची मदत घेतो आहे??, हे उघड्या डोळ्यांनी पाहा, असा स्पष्ट इशारा मोदींनी मतदारांना दिला.

    त्या पाठोपाठ विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या जबाबदार काँग्रेस नेत्याने मुंबई हल्ल्यासाठी संघाला जबाबदार धरत पाकिस्तान आणि अजमल कसाब या दोघांना क्लीन चीट देऊन टाकली.

    माघार घेताना दिला मुश्रीफांचा हवाला!

    पण उज्ज्वल निकम यांना थेट देशद्रोही ठरविल्यावर वडेट्टीवार एका झटक्यात कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आले आणि त्यांना माघार घ्यावी लागली. पण ही माघार घेताना वडेट्टीवार यांनी माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांचा हवाला दिला. सगळीकडूनच वडेट्टीवार यांच्यावर तुफानी हल्ला करण्यात आला. शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांचे वाभाडे काढले. उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली. निवडणूक आयोगात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार झाली. भाजपने मुंबईत त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला.

    या पार्श्वभूमीवर सगळीकडून अडचणीत सापडलेल्या विजय वडेट्टीवार यांनी आपणच केलेल्या विधानापासून माघार घेतली. पण ही माघार घेताना त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला दिला. हेमंत करकरे यांना लागलेल्या गोळी संदर्भात केलेले वक्तव्य आपले स्वतःचे नाही, तर मुश्रीफ यांनी ते पुस्तकात लिहिले आहे. ते फक्त मी पत्रकारांना सांगितले, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. पण त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्यासारखे वरिष्ठ वकील कसे काय देशद्रोही ठरतात??, याचा खुलासा मात्र वडेट्टीवार यांनी केला नाही.

    Kasab didn’t kill Karkare. He’s now giving Kasab & Pakistan a clean chit.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी