• Download App
    देवाची माफी मागत चोरट्याने मंदिरातील चार दानपेट्या फोडल्या, घंटाही चोरली|Karvenagar area one tempal four donation box to burst the theft ,crime registered against accused in warje police station

    देवाची माफी मागत चोरट्याने मंदिरातील चार दानपेट्या फोडल्या, घंटाही चोरली

    मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि पितळेची घंटा असा 77 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे-मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि पितळेची घंटा असा 77 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना कर्वेनगर येथील मारुती भैरवनाथ मंदिरात घडली.दरम्यान पोलिसांना देवळातील सीसीटिव्ही फुटेज मिळाले असून चोरट्याने देवळात प्रवेश केल्यानंतर देवाच्या हात जोडून पाया पडला त्यानंतर नतमस्तक होत प्रणाम केला आणि कानाला दोन्ही हात लावून देवाची माफी मागून दानपेटीचे कुलूप फोडल्याचे दिसून आले आहे.Karvenagar area one tempal four donation box to burst the theft ,crime registered against accused in warje police station

    याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थानाचे व्यवस्थापक सागर तनपुरे (40, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या आवारात दोन वेगवेगळी मंदिरे आहेत. यातील शीतळादेवी मंदिरातील एक दानपेटी,



    तर दुसऱ्या मंदिरात गणपती, मारुती, विठ्ठल रुक्‍मिणी, स्वामी समर्थ आणि भैरवनाथाची मूर्ती आहे. त्यांच्यापुढे तीन दानपेट्या आहेत. चोरट्याने दोन्ही मंदिराची कुलपे तोडून आत प्रवेश केला. यानंतर चारही दानपेट्या फोडून 75 हजारांची रोकड आणि पितळेची घंटा चोरुन नेली. तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करत आहेत.

    Karvenagar area one tempal four donation box to burst the theft ,crime registered against accused in warje police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक