• Download App
    आ. संजय शिंदेंनी 1500 शेतकऱ्यांच्या नावे काढले बोगस कर्ज, कारवाईसाठी पुण्यात बँकेसमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन । Karmala MLA Sanjay Shinde Accused Of Fraud Of 1500 Farmers Bogus Loan, Protest In Pune in front Of PNB Bank Office

    आ. संजय शिंदेंवर 1500 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचा आरोप, पुण्यात बँकेसमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

    Karmala MLA Sanjay Shinde :  करमाळ्याचे आमदार संजयमाम शिंदे यांच्यावर १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा आरोप आहे. याविषयी बँकेने कारवाई नाही केली तर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलक अतुल खुपसे यांनी दिला आहे. Karmala MLA Sanjay Shinde Accused Of Fraud Of 1500 Farmers Bogus Loan, Protest In Pune in front Of PNB Bank Office


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : करमाळ्याचे आमदार संजयमाम शिंदे यांच्यावर १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा आरोप आहे. याविषयी बँकेने कारवाई नाही केली तर अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलक अतुल खुपसे यांनी दिला आहे.

    ‘आ. संजय शिंदे बारामतीकरांचे मांडलिक सरदार!’

    पंजाब बँकेवर आज करमाळ्यामधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले. जर आमदार संजय शिंदेंवर कारवाई झाली नाही, तर ईडी कार्यलायवर उपोषण करण्याचा इशारा अतुल खुपसे यांनी दिला आहे. खुपसे म्हणाले की, करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे म्हणजे मिनी मेहुल चोकसी आहे. इथे शेतकऱ्यांना मागूनही कर्ज मिळत नाही, आणि यांनी बोगस कर्ज कसे काय दिले? संजय शिंदे म्हणजे बारामतीकरांचे मांडलिक सरदार आहे. अजित पवारांना एवढाच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी कारवाईसाठी एक फोनही का केला नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

    काय आहे प्रकरण?

    करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय काढलेली कर्ज वेळेत न भरल्याने ती कर्ज भरण्यासंदर्भात पुण्यातील कोथरूडमधील पंजाब नॅशनल बँकेने वकिलामार्फत नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे. तब्बल 1500 शेतकऱ्यांचे नावे 22 ते 23 कोटी रुपयांचे बोगस कर्ज उचलल्याचा आरोप आहे. यासंदर्भात न्याय न मिळाल्याने आज पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. बँक मॅनेजर कुठलंही उत्तर न देता निघून गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. यावेळी रस्त्यावर मागितलेली भीक बँकेला व संजय शिंदेंना देण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.

    2013 मध्ये कर्ज, 29 मेनंतर बँकेच्या शेतकऱ्यांना नोटिसा

    विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याकडून २०१३ मध्ये खत देतो म्हणून, आधार कार्ड, मतदान कार्ड तसेच सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. २०१३ पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, २९ मेनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मेपर्यंत भरावी अन्यथा फौजदारी कारवाई करावी लागेल, असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला आहे. यावर आमदार संजय शिंदेंची प्रतिक्रया अद्याप समजू शकलेली नाही.

    Karmala MLA Sanjay Shinde Accused Of Fraud Of 1500 Farmers Bogus Loan, Protest In Pune in front Of PNB Bank Office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक