• Download App
    पुणे जिल्ह्याच्या नारायणगावमधून महादेव बेटिंग ॲपची "करामत", एकाच बिल्डिंग मधून 70 - 80 जण पोलिसांच्या ताब्यात!! Karamat of Mahadev Betting App from Narayangaon of Pune District

    पुणे जिल्ह्याच्या नारायणगावमधून महादेव बेटिंग ॲपची “करामत”, एकाच बिल्डिंग मधून 70 – 80 जण पोलिसांच्या ताब्यात!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महादेव बेटिंग ॲपच्या मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याच्या तारा पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्या असून नारायणगावात संपूर्ण बिल्डिंगच बेटिंग मनी लॉन्ड्रीग साठी वापरण्यात येत होती, अशी धक्कादायक माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित बिल्डिंगवर छापे घातले आणि तब्बल 70 ते 80 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली.”Karamat of Mahadev Betting App from Narayangaon of Pune District

    महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रीग आतापर्यंत मुंबई किंवा अन्य मोठ्या महानगरांपर्यंतच मर्यादित असल्याचा खुलासा झाला होता. परंतु, आता थेट पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव सारख्या ग्रामीण भागात महादेव बेटिंग मनी लॉन्ड्रीग प्रकरणाच्या तारा पोहोचल्याने हे मनी लॉन्ड्रीग नेमके किती खोलवर रुजले आहे, याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नारायणगावातील एक अख्खी इमारतच महादेव बेटिंग साठी वापरण्यात येत होती, असा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून झाला आहे. या इमारतीतून 70 ते 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    – ED ची कारवाई

    ED विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपवर बंदी घातली आहे. या अगोदर महादेव बेटिंग प्रकरणात बॉलीवूड मधले कलाकार साहिल खान, हुमा कुरेशी, हिना खान, रणवीर कपूर, कपिल शर्मा, अशा अनेक कलाकारांची नावे देखील नावं पुढे आली. हे सगळे चौकशीच्या रडारवर आहेतच त्याचबरोबर साहिल खानला अटक देखील झाली. त्यातच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील चौकशीच्या जाळ्यात अडकले.*

    दररोज नवी माहिती समोर

    महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बेटिंग ॲपची आणि त्याच्याशी संबंधित इतर एप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

    शाही लग्न सोहळ्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड 

    महादेव बुक एपचा संस्थापक सौरभ चंद्राकरने  मित्र रवी उप्पलसोबत ‘महादेव ऑनलाईन ॲप केलं होतं.या ॲपवर ऑनलाईन बेटिंग केली जात असे. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये  शाही विवाहसोहळा पार पडला. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचे सर्वात मोठे नेटवर्क उघड झाले.

    Karamat of Mahadev Betting App from Narayangaon of Pune District

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस