विशेष प्रतिनिधी
मुंबई : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्य मंत्री पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या शपथविधीनंतर कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. kaplil patil supporters gather in kalyan and distributed sweet
कल्याणच्या खडकपाडा चौकात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
कपिल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा कार्यकर्त्यानी दिल्या. एकमेकांना पेढे आणि मिठाई भरवून त्यांनी आनंद साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
- कपिल पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोष
- केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने कार्यकर्ते आनंदात
- कपिल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है!
- भारतीय जनता पार्टीचा विजय असो, घोषणा
- कल्याणमध्ये पेढे वाटून आनंद साजरा
- भाजप कार्यकर्त्याचा एकच जल्लोष