कंगना रणौतने पोलिसात तक्रार दाखल केली आहे Kangana Ranaut was slapped by a CISF woman employee at Chandigarh airport
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकून कंगना रणौत संसदेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज कंगना रणौत दिल्लीला रवाना झाली आहे. तत्पूर्वी, कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कर्मचारीने कानशिलात लगावल्याची बातमी समोर आली आहे.
चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री राजकारणी बनलेली कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर सक्रिय राजकारणी म्हणून काम करण्यास सज्ज झाली आहे. कंगनाने आज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या कारमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती दिल्लीला निघाल्याची माहिती देताना दिसली आहे. दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, जेव्हा कंगना चंदिगड विमानतळावर पोहोचली तेव्हा एका महिला CISF कर्मचारीने तिला कानशीलात लगावली. यानंतर कंगना राणौतने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनातील महिला शेतकऱ्यांच्या वतीने कंगनाने दिलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या CISF महिला कर्मचारी कुलविंदर कौरने कंगनाला कानशीलात लगावली. तक्रारीनंतर कुलविंदर कौर यांना कमांडंटच्या खोलीत बसवण्यात आले. त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कंगना राणौत आज मंडीतून खासदार झाल्यानंतर विस्तारा एअरलाइन्स चंदीगडहून दिल्लीला निघाली होती. यावेळी ती सुरक्षा तपासणीसाठी पुढे गेली असता सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौरने तिला कानशीलात लगावली. या गोंधळानंतर कंगना रणौत आता दिल्लीला रवाना झाली आहे.
Kangana Ranaut was slapped by a CISF woman employee at Chandigarh airport
महत्वाच्या बातम्या
- NDA 8 जून करू शकते सरकार स्थापनेचा दावा; राष्ट्रपती भवनात 9 जूनला शपथविधीची शक्यता
- दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??
- मुस्लिम प्रभाव क्षेत्रात एकगठ्ठा मतदानाचा भाजपला देशभरात 30 % फटका!!; ममता + राहुल + अखिलेश + उद्धव या “लाभार्थीं”च्या जागा वाढल्या!!
- NDAच्या बैठकीपूर्वी नितीश सरकारने केली ‘ही’ मोठी मागणी