• Download App
    कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट , कंगना बनणार आता ' या ' प्रकल्पाची ब्रँड अ‍ॅम्बेसिडरKangana Ranaut meets Yogi Adityanath, Kangana will now be the brand ambassador of 'this' projectle% | The Focus India

    कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट , कंगना बनणार आता ‘ या ‘ प्रकल्पाची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

    उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आले आहे.Kangana Ranaut meets Yogi Adityanath, Kangana will now be the brand ambassador of ‘this’ project


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तरप्रदेशाच्या एका महत्वाच्या मोहिमला आता वेग मिळणार आहे.सत्ताधारी शिवसेनेविरोधात उघडपणे पंगा घेणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

    कंगनाने कल (शुक्रवारी ) योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती . यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले.ODOP म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. या मोहिमेसाठी कंगनाची निवड झाली.



     

    इतकेच नव्हे तर या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणं त्यांनी कंगनाला दिले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचेदेखील म्हटले आहे.

    यूपी सरकारने राज्यातील ७५ जिल्ह्यांमध्ये उत्पादन-विशिष्ट पारंपारिक औद्योगिक केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

    प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.उत्तर प्रदेश मधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

    या मोहिमेच्या मोठा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे उत्तरप्रदेश सरकारकडून सांगण्यात आले. कंगनाची प्रमुख भूमिका असलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कंगना तिच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. काल शुटींग संपवून ती लखनौला आली होती.

    Kangana Ranaut meets Yogi Adityanath, Kangana will now be the brand ambassador of ‘this’ project

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस