• Download App
    कमलनाथ-ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गेहलोत- सचिन पायलट आणि आता नितीन राऊत- नाना पटोले, गलितगात्र कॉँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच|Kamal Nath-Jyotiraditya Shinde, Ashok Gehlot-Sachin Pilot and now Nitin Raut-Nana Patole, factionalism continues in Congress

    कमलनाथ-ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गेहलोत- सचिन पायलट आणि आता नितीन राऊत- नाना पटोले, गलितगात्र कॉँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: गलितगात्र कॉँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच असून कमलनाथ-ज्योतिरादित्य शिंदे, अशोक गेहलोत- सचिन पायलट आणि आता नितीन राऊत- नाना पटोले असा संघर्ष सुरू झाला आहे. आता त्यांचा वाद राहूल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पण राहूल गांधी यांच्याकडून फार काही होण्याची कॉँग्रेसला अपेक्षा नाही.Kamal Nath-Jyotiraditya Shinde, Ashok Gehlot-Sachin Pilot and now Nitin Raut-Nana Patole, factionalism continues in Congress

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत थेट राहुल यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. राहुल यांची भेट घेऊन ते पटोले यांची तक्रार करणार आहेत. राऊत यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत.



    नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. ते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत मतभेदावरून ते राहुल यांची भेट घेणार आहेत. खास करून पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार राहुल यांच्याकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

    नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. परंतु, अध्यक्षपद कुणाला द्यायचं यावरून काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे या अधिवेशनातही अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही.

    विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदावरूनही काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांच्यासोबत हे दोन्ही नेते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये म्हटले होते की नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित आहे.

    नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची आॅफर आली होती. तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्यातही त्यांनी ऊर्जा विभाग मिळण्याचे सूतोवाच केलं होतं. त्यावर नितीन राऊत नाराज झाले होते. आपलं पद जाऊ नये म्हणून राऊत यांनी दिल्लीवारीही केली होती.

    Kamal Nath-Jyotiraditya Shinde, Ashok Gehlot-Sachin Pilot and now Nitin Raut-Nana Patole, factionalism continues in Congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!