• Download App
    कल्याण : गौरीपाडा तलावाच्या काठावर अनेक कासवं आढळली मृतावस्थेत, प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त । Kalyan: Many turtles were found dead on the banks of Gauripada lake.

    कल्याण : गौरीपाडा तलावाच्या काठावर अनेक कासवं आढळली मृतावस्थेत, प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त

    या कासवांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Kalyan: Many turtles were found dead on the banks of Gauripada lake.


    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या काठावर अनेक कासवं ही मृतावस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कासवांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.या तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे. या कासवांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    परिसरामध्ये जवळपास 85 च्या आसपास कासवांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. आज पुन्हा एकदा अनेक कासंव मृतावस्थेमध्ये आढळून आले आहेत. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती भाजपाचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी दिली.



    माहिती मिळताच दया गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित घटनेची माहिती महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास कळवली.विशेष म्हणजे यातील काही कासवांनी तर शेजारच्या गावात आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात अशीच एक घटना घडली होती. या परिसरात अनेक पक्षी मृतावस्थेमध्ये आढळून आले होते.

    मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तलावाच्या पाण्यात काही मिसळले गेले असल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

    Kalyan : Many turtles were found dead on the banks of Gauripada lake.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !