विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kalyan Dombivli स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.Kalyan Dombivli
आम्ही काय खावे हे सांगण्याचा अधिकार त्यांना नाही
नॉन-व्हेजवर बंदी प्रकरणी प्रश्न विचारला असता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही याचा कडकडून विरोध करू. 15 ऑगस्टच्या दिवशी व्हेज खा नाहीतर नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार या महानगरपालिकांना नाही आणि आयुक्तांनाही नाही. लोकांनी काय करावे, काय करू नये, काय खावे किंवा काय खाऊ नये हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही.Kalyan Dombivli
अनेक लोक व्हेज खातात त्यांना विरोध नाही. पण जे आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक आहेत, जे कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी-कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि आमच्या राज्यात येऊन तुम्ही हे व्हेज खाण्याचे लादत आहात का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात म्हणून एकेकाळी भाजप सुद्धा अग्रेसर होता. आता त्यांनी जिंकायचे रसायन काढले आहे त्यामुळे तुम्ही आता बॅलेट काय चंद्रावर पण मतदान घ्या तिथे जाऊन लोक मतदान करून येतील अशी सिस्टम त्यांनी बसवली आहे. शकुन राणे नामक व्यक्ती 5 वेळा मतदान करत आहेत, एक बाई आहेत 124 वर्षांच्या, जगातल्या सर्वात वयस्कर महिला, दिसतात 25 सारख्या पण वय आहे 124. हे असे सगळे घोळ आम्ही पकडले आहेत.
निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट काढण्याच्या तयारीत
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता व्हीव्हीपॅट सुद्धा काढून टाकण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे. आता निवडणूक आयोगाने ठरवले पाहिजे की निवडणुका घ्यायच्या आहेत की त्यांच्या ओळखीतले जे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचे की हेच जिंकले. निवडणूक आयोग दिल्लीत बसते, निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Kalyan Dombivli Non Veg Ban August 15
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
- महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!
- Israeli Attack : इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार; इस्रायलने त्यांना हमास दहशतवादी म्हटले
- Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका