• Download App
    धर्मसंसदेत गांधीजींबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण महाराजाने लढविली होती अकोला नगरपालिकेची निवडणूक|Kalicharan Maharaj had contested Akola municipal elections

    धर्मसंसदेत गांधीजींबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण महाराजाने लढविली होती अकोला नगरपालिकेची निवडणूक

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : महात्मा गांधी यांनी देशाचा सत्यानाश केला. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रणाम असे वक्तव्य हरिद्वारमधील धर्मसंसदेत केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आहे. या महाराजांनी अकोला नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता.Kalicharan Maharaj had contested Akola municipal elections

    हरिद्वार येथे धर्मसंसद कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द बोलणारे कालीचरण महाराज हे महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजीनगर या भागात राहतात. कालीचरण यांचे खरे नाव अभिजीत धनंजय सराग असे असुन ते भावसार समाजाचे आहेत.



    एका साधारण कुंटुंबात जन्मलेल्या अभिजीत सराग यांचे वडिल धनंजय सराग यांचे अकोल्यातील जयन चौक या परिसरात एक मेडिकल शॉप होते. कालीचरण महाराजांनी 2017 साली अकोलामध्ये नगरपालिका निवडणूक लढवली होती.

    या निवडणुकीत महाराजांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाराजांनी पुन्हा 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही.

    48 वर्षीय कालीचरण महाराज यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. ते फक्त आठवीपर्यंत शिकले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी शालेय शिक्षण कमी घेतले असले तरीही त्यांनी धार्मिक शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले आहे.

    महाराष्ट्राशिवाय देशाच्या अनेक भागात महाराजांचे भक्त आहेत. महाराष्ट्राशिवाय देशाच्या अनेक भागात महाराजांचे भक्त आहेत. कालीचरण महाराज यांचे कुंटुंब गरीब असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना इंदूर येथे आपल्या मावशीकडे पाठवले होते. त्यामुळे महाराजांचे मराठी सोबतच हिंदीवर देखील चांगले प्रभूत्व आहे.

    इंदूरमध्ये असल्याकारणाने कालीचरण महाराज हे भय्यूजी महाराज यांच्या आश्रमामध्ये जायचे. त्यामुळे कालीचरण आणि भय्यूजी महाराज यांच्यात चागंली मैत्री झाली. या आश्रमातून कालीचरण यांनी महाराज ही उपमा मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले.

    सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत. महाराजांचे शिव तांडव स्त्रोत सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले.कालीचरण महाराज दरवर्षी अकोल्यात होणाऱ्या कांवड़ जत्रेत भाग घेतात.

    गेल्या वर्षी महाराजांनी मध्य प्रदेशात शिव तांडव स्त्रोत म्हटले होते. तेव्हापासून कालीचरण महाराजांना प्रसिद्धी मिळाल्याचे समजते. शिव तांडव गायिलेला तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील कालीचरण महाराजांचा तो व्हिडिओ शेअर केला होता.

    Kalicharan Maharaj had contested Akola municipal elections

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!