• Download App
    पवारांचा नुसताच आव, म्हणे आपणच तारणहार; चंद्रकांतदादांचे शरसंधान!! Just pretend to be Pawar, say you are the savior

    Maratha – OBC Reservation : पवारांचा नुसताच आव, म्हणे आपणच तारणहार; चंद्रकांतदादांचे शरसंधान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाचे आपणच तारणहार आहोत, असा शरद पवार नुसताच आव आणतात. परंतु प्रत्यक्षात आरक्षण टिकविण्यासाठी ते काही करत नाहीत, असे शरसंधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी साधले आहे. Just pretend to be Pawar, say you are the savior

    मराठा आरक्षण रद्द झाले. त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. पण ठाकरे – पवार सरकार हे 1 इंचही पुढे सरकले नाही. आता ओबीसी आरक्षणही ते रद्द करण्याच्या दिशेने चालले आहेत. या बाबतीतही ठाकरे – पवार सरकारने दिरंगाई केली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे. शरद पवारांचा नुसताच आव आणतात की आपण मराठा समाजाचे, ओबीसी समाजाचे तारण आहोत. परंतु त्यांचे आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही, असे टीकास्त्र चंद्रकांत दादा पाटील यांनी सोडले आहे.

    – भुजबळ, वडेट्टीवार यांचे आरोप फेटाळले

    महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण अडकून राहण्याला आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. परंतु या दोन्ही मंत्र्यांचे आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मराठा किंवा ओबीसी आरक्षणासाठी सरकारने समिती देखील नेमले नाही. एम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. सुप्रीम कोर्टाने जे निकष सरकारला सांगितले होते, त्यापैकी एकही निकष ठाकरे – पवार सरकारने पूर्ण केला नाही म्हणून दोन्ही आरक्षणे लटकली.

    – निवडणुकीत परिणाम दिसतील

    शरद पवारांनी देखील याबाबत काहीही केले नाही. फक्त आपण मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे तारणहार आहोत, असे ते भासवत राहतात पण आता दोन्ही समाजांना ते कळून चुकले आहे की पवार आपल्यासाठी काही करत नाही. त्याचा परिणाम निवडणूकीत निश्चित दिसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास चंद्रभान दादा यांनी व्यक्त केला आहे.

    Just pretend to be Pawar, say you are the savior

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!