Thursday, 1 May 2025
  • Download App
    जरा सेन्सिबल माणसाबद्दल प्रश्न विचारा!!; पत्रकारांना उत्तर देताना फडणवीसांचा राऊतांना टोला Just ask a question about a sensible man Fadnavis taunts Raut while replying to reporters

    जरा सेन्सिबल माणसाबद्दल प्रश्न विचारा!!; पत्रकारांना उत्तर देताना फडणवीसांचा राऊतांना टोला

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. राऊतांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यालाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. Just ask a question about a sensible man Fadnavis taunts Raut while replying to reporters

    देवेंद्र फडणवीस माझ्यावर कितीही कारवाई करा तुमची सगळी कारस्थानं मला माहीत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला असता, फडणवीसांनी हसत-हसत राऊतांवर निशाणा साधला आहे.

    त्यांनी पक्षाची अवस्था काय केली?

    संजय राऊत यांना आता तरी समज येणं गरजेचं आहे. त्यांनी पक्षाची अवस्था काय केली आहे ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता, त्यापेक्षा सेन्सिबल माणसाबद्दल प्रश्न विचारा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला हाणला आहे.

    राऊतांचं ट्विट

    ‘छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असे म्हणत पाटलांच्या विधानावर स्पष्टीकरण देत सावरलं. पण, ठीक ढंग से बोले गए झूठ को ही आज कल सत्य कहते है, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

    Just ask a question about a sensible man Fadnavis taunts Raut while replying to reporters

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!