रुपेरी पडद्यावरील शाहरुख आणि जुहीची केमिस्ट्री प्रत्यक्ष जिवनातदेखील तेवढीत जिवंत आणि खरी आहे.Juhi Chawla became a guarantor for Aryan, read Shahrukh Khan and Juhi’s chemistry?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहरुखचा मुलगा तुरुंगाबाहेर यावा म्हणून जुही कोर्टाची पायरी चढली. तसेच जामीनदार म्हणून हजेरी लावली. याच कारणामुळे पुन्हा एकदा शाहरुख आणि जुही या जोडीची चर्चा सुरु झाली आहे. शाहरुख खान आणि जुही चावला ही जोडी सिनेरसिकांनी डोक्यावर घेतली. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहीट ठरले आहेत. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री प्रत्यक्ष जिवनातदेखील तेवढीत जिवंत आणि खरी आहे.
संकटकाळी दोघेही मित्र म्हणून एकमेकांच्या मदतीसाठी कायम उभे असतात. आणि त्याच उदाहरण देखील त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळालं. यावेळी देखील आर्यनच्या सुटकेसाठी जुही जामीनदार म्हणून हजर होती.
जुही आणि शाहरुख यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘येस बॉस’, ‘डुप्लिकेट’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि ‘डर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी सोबत काम केले आहे. या चित्रपटांतील दोघांचा अभिनय तसेच त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटादरम्यान अभिनेता शाहरुख खान आणि जुहीची पहिली भेट झाली होती.
जुहीने पहिल्यांदा शाहरुख खानला दिलेली पहिली प्रतिक्रिया
शाहरुखने जुहीला पहिल्यांदा पाहिल्यावर दिलेली प्रतिक्रियादेखील तेवढीच विशेष आणि भन्नाट होती. शाहरुख खानला पाहिल्यानंतर जुही चावलाने तोंड वाकडं केलं होतं. जुहीला शाहरुख अजिबात आवडला नव्हता. जुहीला ‘राजू बन गया जेंटलमन’ची स्क्रिप्ट मिळाली होती. चित्रपटाची कथा जाणून घेतल्यानंतर जुहीला तिच्या सहकलाकाराबद्दल जाणून घ्यायचे होते.
अभिनेत्याने ‘फौजी’ या मालिकेत काम केल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. पण जुहीने ती मालिका पाहिली नव्हती. तो आमिरसारखा दिसतो, हे ऐकून जुहीला आनंद झाला होता. दरम्यान, दोघेही इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक आहेत. रुपेरी पडद्यापासून व्यवसायापर्यंत सोबत असलेले हे दोन्ही कलाकार चांगले मित्र आहेत.
Juhi Chawla became a guarantor for Aryan, read Shahrukh Khan and Juhi’s chemistry?
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे