• Download App
    पत्रकार म्हणतात, हे युध्द असेल तर आम्ही रणभूमीवर आहोत, आता तरी उध्दव ठाकरे मागण्या पूर्ण करणार का?|Journalists say, if this is a war, we are on the battlefield, will Uddhav Thackeray fulfill the demands now?

    पत्रकार म्हणतात, हे युध्द असेल तर आम्ही रणभूमीवर आहोत, आता तरी उध्दव ठाकरे मागण्या पूर्ण करणार का?

    कोरोनाविरुध्द सध्या युध्द सुरू आहे असे आपण म्हणता तर आम्ही रणभूमीवर आहोत. आम्हाला लढण्यासाठी किमान शस्त्रे द्या. लसीकरणात प्राधान्य आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्टÑातील पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आपल्याच मंत्रीमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या याबाबतच्या मागणीला केराची टोपली दाखविणारे उध्दव ठाकरे आता तरी पत्रकारांची मागणी पूर्ण करणार का? असा सवाल केला जात आहे.Journalists say, if this is a war, we are on the battlefield, will Uddhav Thackeray fulfill the demands now?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाविरुध्द सध्या युध्द सुरू आहे असे आपण म्हणता तर आम्ही रणभूमीवर आहोत. आम्हाला लढण्यासाठी किमान शस्त्रे द्या. लसीकरणात प्राधान्य आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    आपल्याच मंत्रीमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या याबाबतच्या मागणीला केराची टोपली दाखविणारे उध्दव ठाकरे आता तरी पत्रकारांची मागणी पूर्ण करणार का? असा सवाल केला जात आहे.



    राज्यातील सुमारे ९० पत्रकारांनी शुक्रवारी झूमवर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे दोन मुख्य मागण्या केल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पत्रकारांना प्राधान्य द्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली.

    स्मृति कोप्पीकर म्हणाल्या गेल्या वर्षभरापासून आम्ही पत्रकार कोरोना महामारीचे वृत्तांकन करत आहोत. मात्र, आम्हाला फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही. आत्तापर्यंत राज्यातील १२६ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे असे मराठी पत्रकार परिषदेने म्हटले आहे.

    मुंबईत हिंदूचे पत्रकार विवेक बेंद्रे, नवाकाळचे सदानंद शिंदे, बिझनेस इंडियाचे सुमित घोषाल, एएनआयचे संभाजी पालकर, एनडीटीव्हीचे संजय रोकडे आणि दैनिक सागरचे जयराम सावंत यांचे मृत्यू झाले.

    गेल्या काही आठवड्यांत देशातील बारा राज्यांत पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा दिला आहे. त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, महाराष्टÑात मात्र हे झालेले नाही.

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी मागणी केली आहे.काही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून दर्जा दिला तर

    आपल्यावर आर्थिक बोजा पडेल,असे सरकारला वाटत आहे. कारण मग पत्रकारांना विमा आणि इतर आर्थिक लाभ द्यावे लागतील. मात्र, पत्रकारांची मागणी साधी आहे. त्यांना लसीकरणात प्राधान्य द्यावे आणि प्रवासाची मुभा द्यावी.

    Journalists say, if this is a war, we are on the battlefield, will Uddhav Thackeray fulfill the demands now?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक