प्रतिनिधी
मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत 5000 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर उमेदवारांना याद्वारे बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची सुरूवात ७ सप्टेंबर २०२२ पासून झाली आहे.Job Opportunity : SBI Bank Mega Recruitment for 5000 Posts; Apply like this!!
अटी व नियम
पदाचे नाव – कनिष्ठ सहयोगी/ Clerk
पदसंख्या – ५ हजार ८
वयोमर्यादा – २० ते २८ वर्ष
अर्ज पद्धतील – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
अर्ज शुल्क – या पदांसाठी प्रवर्गानुसार शुल्क भरावे लागेल. General/OBC/EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील तर SC/ST/PwBD/DESM या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्जशुल्क नाही.
परीक्षा केव्हा होणार?
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान मुख्य परीक्षा होईल. या पदासाठी उमेदवारांना १९९०० मूळ वेतन मिळेल.
SBI Clerk भरतीसाठी अर्ज कसा कराल ?
यासाठी उमेदवाराला SBI चे अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर जावे लागेल.
Career या पेजवर क्लिक करा
SBI Clerk 2022 apply online यावर क्लिक करा
यानंतर registration प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल. त्यानंतर एसबीआय क्लर्क परीक्षा ओळखपत्रासाठी लॉगिन तपशील भरा. तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून Application फॉर्म सबमिट करता येईल.
Job Opportunity : SBI Bank Mega Recruitment for 5000 Posts; Apply like this!!
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा बाबत नेत्यांमध्ये कन्फ्युजन, पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार!
- विदर्भात येऊन गडकरींचा शेतकऱ्यांना ‘परखड’ सल्ला; सरकारच्या भरवशावर फार राहू नका!
- चाणक्य वगैरे बात सोडा, आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच!!; फडणवीसांचा टोला
- पवारांशी जवळीक आणि नानांची ऑफर; गडकरींचे भाजप मधले वजन वाढवतील की घटवतील??