• Download App
    नोकरीची संधी : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्जाची शेवटची तारीख!!; असा करा अर्ज |Job Opportunity : MPSC Recruitment for 228 Posts, Last Date to Apply Today!!; Apply like this

    नोकरीची संधी : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्जाची शेवटची तारीख!!; असा करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेत अर्ज करावा.Job Opportunity : MPSC Recruitment for 228 Posts, Last Date to Apply Today!!; Apply like this

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससीकडून (MPSC) ग्रुप सी पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेला आधीच सुरुवात झाली होती. आज 22.8.2022 रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.



    रिक्त पदांचा तपशील

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी ग्रुप सी अंतर्गत 228 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

    कशी असेल निवड प्रक्रिया?

    या भरतीसाठी 05 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जाईल. ही भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 077/2022 नुसार विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाईल.

    परीक्षेचा पॅटर्न

    एमपीएससी ग्रुप सी पदांसाठी 100 गुणांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. या पदांसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला सूट मिळेल. पदांसाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचू शकता.

    अर्जाचे शुल्क

    या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 394 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गाला शुल्कात सूट मिळेल.

    Job Opportunity : MPSC Recruitment for 228 Posts, Last Date to Apply Today!!; Apply like this

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस