• Download App
    TCS मध्ये नोकरीची संधी; 40000 कर्मचाऱ्यांची होणार भरती|Job Opportunity in TCS; 40000 employees will be recruited

    TCS मध्ये नोकरीची संधी; 40000 कर्मचाऱ्यांची होणार भरती

    प्रतिनिधी

    मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS अर्थात टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40000 फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती TCS सीओओ एन. गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.Job Opportunity in TCS; 40000 employees will be recruited

    आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35000 ते 40000 नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात. टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरू आहेत. असे असताना कंपनी कोणत्याही प्रकारची कर्मचारी कपात करणार नाही, असेही सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले आहे.



    इन्फोसिसने या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करणार नसल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी कंपनीने 50000 फ्रेशर्सची नियुक्ती केली होती. जोपर्यंत मागणीत वाढ होत नाही तोपर्यंत कॅम्पस हायरिंग करणार नसल्याचे इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितले होते.

    सध्या कॅम्पस हायरिंग नाही

    सुब्रह्मण्यम यांनी लॅटरल एन्ट्रीद्वारे नोकऱ्या देण्याची शक्यता नाकारली नाही. इन्फोसिसची नियुक्ती धोरण मागणीशी निगडीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागच्या वर्षी 50000 तरुणांना मागणीच्या अगोदर कामावर घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कर्मचाऱ्यांना AI इत्यादी मध्ये प्रशिक्षण देत आहोत. सध्या आम्ही कॅम्पसमध्ये जात नाही. आम्ही आमच्या भविष्यातील अंदाज लक्षात घेऊन प्रत्येक तिमाहीत याकडे लक्ष देऊ. प्रोजेक्ट आल्यावर भरती केली जाईल, असे सुब्रह्मण्यम यांनी स्पष्टपणे सांगितले.

    गेल्या 12 ते 14 महिन्यांत मोठी घसरण

    जेव्हा खर्चात कपात करण्याचा दबाव असतो तेव्हा लॅटरल एंट्रीद्वारे कमी संख्येने कर्मचारी नियुक्त केले जातात. गेल्या 12 ते 14 महिन्यांत मोठी घसरण झाली आहे. हे किती काळ चालू राहील माहिती नाही, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना आम्ही कामावर घेतले. TCS चा मनुष्यबळच्या वापराचा दर सध्या सुमारे 85 % आहे, जो पूर्वी 87-90 % इतका होता, असेही यावेळी सांगण्यात आले.

    Job Opportunity in TCS; 40000 employees will be recruited

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा