विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि मोठा ग्रुप असलेल्या टाटा ग्रुपमध्ये विविध कंपन्यांमध्ये ४,५६४ रिक्त जागा आहेत. या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे नोकरीची संधी मिळू शकणार आहे.Job opportunities in Tata Group, 4564 vacancies in various companies will be filled soon
टाटा ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोरोना संकटाचा मोठा फटका देशाला बसला. देशातील अनेक उद्योग बंद झाले. ऑटोमोबाइल क्षेत्र ते सेवा क्षेत्रातील लाखो रोजगार संपुष्टात आले.
बेरोजगारीचे प्रमाण वाढले. मात्र, हळूहळू आता देश सावरत असून, उद्योगांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात होत आहे. या कोरोना संकटातही अनेक उद्योगांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये टाटा ग्रुपमधील अनेक कंपन्या आघाडीवर होत्या
ग्रुपमधील अनेक कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार ५६४ जागा रिक्त असून, यासाठी अर्ज मागवले जात आहे. गेल्या ३० दिवसांपासून २१८८ तर गेल्या ७ दिवसांपासून ६१७ ओपन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात आली. सध्या टाटा ग्रुपमध्ये सुमारे ७.५ लाख नोकरदार देश आणि विदेशात काम करतात. बी-७३७ एअरलाइनमध्ये पायलटपासून ते एन्ट्री लेवल कस्टमर सुपरवायझरपर्यंत विविध पदांसाठी अनुभवी, स्किल्स आणि शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर भरती केली जाणार आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स,टाटा कम्युनिकेशन, टायटन कंपनी, टाटा कॅपिटल, टाटा एआयए लाइफ, जॅग्वार लँड रोव्हर, टाटा स्काय यांसारख्या कंपन्यांमध्यो नोकरीसाठी अर्ज करू शकता. टाटा ग्रुप कर्मचाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करते. काही दिवसांपूर्वी देशातील १७ कापोर्रेट घराण्यांबाबत एक सर्व्हे घेण्यात आला.
यामध्ये रिलायन्स नाही तर टाटा ग्रुप सर्वात विश्वासार्ह ग्रुप असल्याचे लोकांनी सांगितले. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी म्हणजे दुपटीहून अधिक होती. टाटा स्टीलला गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विश्वास मिळाला.
गेल्या वर्षी ही विश्वासार्हता ३२ टक्के होती. यंदा ती ६६ टक्क्यांवर गेली आहे. या सर्व्हेमध्ये १५३ वर्षे जुना बिर्ला आणि मुकेश अंबानींचा रिलायन्स समूहदेखील सहभागी करण्यात आला आहे. या दोन्ही समुहांना अनुक्रमे पाच आणि ४.७ गुण मिळाले असून ते दुसºया आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Job opportunities in Tata Group, 4564 vacancies in various companies will be filled soon
महत्त्वाच्या बातम्या
- Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
- लखीमपूर घटनेवर शरद पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले- मोदी सरकारची नियत दिसली, यूपीत तर जलियानवाला बागसारखी परिस्थिती!’
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- स्वातंत्र्य@75; उत्तर प्रदेशात 75 जिल्ह्यातील 75000 लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे प्रदान