‘आयटी’ आणि ‘मायक्रोफायनान्स’ क्षेत्रातील उत्तम पगाराच्या नोकरीसाठी होणार ‘ऑन द स्पॉट’ निवड
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पदवीधर असूनही अद्याप पर्यंत नोकरी न मिळालेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण, छत्रपती संभाजीनगर येथील आनंदी एम्पॉर फाउंडेशनच्या वतीने प्रयत्नातून प्रगती या ब्रीदानुसार जॉब फेअर- 2023चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी असोशिएट्स KCS, IC, AIMS आहेत. Job Fair 2023 organized by Anandi Empower Foundation
या अंतर्गत आयटी आणि मायक्रोफायनान्स क्षेत्रात प्रत्येकी ५०० म्हणजे एक हजार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय दोन्ही क्षेत्रातील नोकरीसाठी २५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. रविवार ९ जुलै १० वाजता मुलाखती सुरु होणार असून, ऑन द स्पॉट सलेक्शन केले जाणार आहे.
या जॉब फेअरच्या संधीच्या लाभ घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. शिवाय, आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची सत्यप्रत(ओरिजनल कॉपी) आणि बायोडाटाची प्रत सोबत आणणे आवश्यक असणार आहे.
याशिवाय, अगोदर रजिस्ट्रेशनही करणे बंधनकारक आहे. यासाठी ८८०५६२०१८७, ८९७५८५७१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. पत्ता – पहिला मजला, मायफेअर टॉवर समोर, उल्कानगरी, छत्रपतीसंभाजीनगर.
Job Fair 2023 organized by Anandi Empower Foundation
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला
- “केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’
- राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??
- Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!