प्रतिनिधी
मुंबई : जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा एजंट आहे. त्याच्यासह ईडीच्या 4 अधिकाऱ्यांनी 100 बिल्डर आणि कॉर्पोरेट कडून खंडणी गोळा केली आहे. त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. लवकरच ते गजाआड जातील, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.Jitendra Navlani’s ransom racket; Recovered from 100 builders rajendra – 7767016524
या पत्रकार परिषदेला शिवसेना भवनात ते आणि खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते. गेल्या वेळच्या पत्रकार परिषदेत प्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांनी या वेळच्या पत्रकार परिषदेत गर्दी केलेली दिसली नाही. संजय राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर नाव न घेता जोरदार तोफा डागल्या. त्यांनी किरीट सोमय्या वगळता कोणत्याही भाजपने त्याचे नाव या पत्रकार परिषदेत घेतले नाही.
संजय राऊत म्हणाले :
- किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील. नील सोमय्या हे वाधवान यांच्यासोबत निकॉन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
- पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे?
- 100 हून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली. चौकशी केल्यानंतर ईडीचे काही अधिकारी तुरूंगात जातील.
- जितेंद्र नवलानी रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल करणार आहे. या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करतील. चौकशी केल्यानंतर ईडीचे 4 अधिकारी तुरूंगात जातील. जितेंद्र नवले नवलानींच्या 7 बोगस कंपन्या.
- जितेंद्र नवलानी हे ईडीचे रॅकेट चालवतात. ईडीने दिवाण हाऊसिंगचा तपास सुरू केला. हा तपास सुरू केल्यानंतर दिवाण हाऊसिंगकडून अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी रूपये ट्रान्सफर केलेत.
- किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट आहेत. भाजपकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जात आहे. ईडिकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
- ईडी भाजपची एटीएम मशीन आहे. बेनामी संपत्ती असलेल्या भाजपच्या नेत्यांची नावं पंतप्रधान मोदींना देणार आहे. याबातचे पुरावे आमच्याकडे आहेत.
- आयटी आणि ईडीला आतापर्यंत आम्ही 50 जणांविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, ईडीकडून फक्त सरकार पाडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात धाडी टाकल्या जात आहेत. ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत.
- सरकार पाडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. पण शिवसेनेलाही छापे टाकण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त धाडी कशा पडत आहेत? असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.