विशेष प्रतिनिधी
नागपूर : Jitendra Awhad बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात आहेत. त्यामुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तरच या प्रकरणात योग्य चौकशी होईल,’ असे शरद पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.Jitendra Awhad
बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चर्चेत आव्हाड म्हणाले की, “वाल्मीक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? कराडचा ‘आका’ तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलिस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा कशी बाळगायची, असेही आव्हाड म्हणाले.
पोलिस निरीक्षकाच्या गाडीत बसून फिरत होते आरोपी
भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले की, या प्रकरणात सुदर्शन घुले याने मस्साजोगच्या एका दलित वॉचमनला मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी देशमुख पोलिस ठाण्यात गेले. पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. महाजन नावाच्या पोलिस निरीक्षकाच्या गाडीतून आरोपी फिरत होते.