• Download App
    अटक टाळण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची ठाणे कोर्टात धाव, उद्या सुनावणी; पण कलम 354 विनयभंगाचा गुन्ह्यातील तरतुदी काय? Jitendra Awhad runs to Thane court to avoid arrest

    अटक टाळण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची ठाणे कोर्टात धाव, उद्या सुनावणी; पण कलम 354 विनयभंगाचा गुन्ह्यातील तरतुदी काय?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होताच जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून तेथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या अर्जावर कोर्टात उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. Jitendra Awhad runs to Thane court to avoid arrest

    दरम्यानच्या काळात आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केल्याची माहिती आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार आहे. कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कोणावरही सूड भावनेने कारवाई करणार नाही. पण कोणी कायदा हातात घेतला, तर त्यालाही सोडणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

    जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे की नाही याची आपल्याला माहिती नाही. पण ते आणि मी काल एका कार्यक्रमात एकत्र होतो. ते लोकप्रतिनिधी आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. पोलीस त्यांच्या प्रकरणातला तपास करून कायद्यानुसार योग्य निर्णय घेतील. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

     354 कलम, विनयभंगाचा गुन्हा

    भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 354 कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय बवाल उभा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अश्रू ढाळले आहेत, पण आव्हाडांच्या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या 354 कलमाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. हे 354 कलम नेमके आहे तरी काय??, त्यातील तरतुदी कोणत्या आणि त्या कशा गंभीर आहेत??, हे समजून घेतले पाहिजे.

     कलम 354 : विनयभंग

    महिलेच्या इच्छेविरोधात तिच्या शालिनतेचा भंग करणाऱ्या कृत्यापासून तिचे संरक्षण करण्यासाठी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 354 मध्ये विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.

    महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे. एखाद्या महिलेच्या मनात लज्जा निर्माण करण्यासाठी किंवा तिला अपमानित करण्याच्या हेतूने असे केल्यास किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केला, महिलेच्या शालिनतेला धक्का पोहोचला तर त्याचे हे कृत्य शिक्षेस पात्र आहे. या कलमात 1 वर्ष ते 5 वर्षांच्या सक्तमजुरीसह दंडाचीही तरतूद आहे.

    कलम 354 अ : लैंगिक छळ

    पुरुषाने अशी कोणतीही कृती केल्यास, ज्यात  शारीरिक स्पर्श. लैंगिक संबंधांची ऑफर देणारी हालचाल करणे, लैंगिक सुखाची मागणी किंवा प्रस्ताव ठेवणे, महिलेच्या इच्छेविरोधात अश्लील हावभाव करणे,
    लैंगिक टिप्पणी करणे या प्रकरणात व्यक्ती दोषी आढळला, तर त्यास 3 वर्षांपर्यंत सक्तमजुरीसह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.



     

     कलम 354 ब : महिलेचे कपडे काढणे

    महिलेचे कपडे काढण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे किंवा महिलेवर हल्ला करून अथवा गुन्हेगारी बळाचा वापर करून तिला कपडे काढण्यासाठी किंवा तसे कृत्य करणे वा नग्न होण्यासाठी बाध्य करणे. यात किमान 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंत कैदेसह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

     कलम 354 क : कामुकता

    आपल्याला कुणीही बघणार नाही अशा अपेक्षेने एखाद्या खासगी कृतीत लीन असलेल्या महिलेला कोणताही पुरुष बघत असेल किंवा अशा स्थितीत तिचे छायाचित्र कॅप्चर करत असेल तर दोषसिद्धीनंतर त्याला किमान 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत कैदेसह दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. यात दुसऱ्यांदा दोषसिद्धी झाल्यास कैदेची शिक्षा 7 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

    या कलमात खासगी कृती म्हणजेच, यथोचितरित्या गोपनीयतेची अपेक्षा असलेल्या अशा ठिकाणी जिथे पीडितेचे जननांग, नितंब किंवा स्तन उघडे असतील किंवा केवळ अंतर्वस्त्रांनी झाकलेले असेल. किंवा
    पीडिता शौचालयाचा वापर करत असेल, किंवा पीडिता लैंगिक कृती करत असेल अशा वेळी तिला पाहणे हा आहे.

    या शिवाय असे ठिकाण जिथे पीडितेची छायाचित्र काढण्यास सहमती आहे पण तिसऱ्या व्यक्तीकडे त्याच्या प्रसाराला तिची सहमती नाही. अशा स्थितीत अशा छायाचित्राचा प्रसार केल्यास या कलमानुसार तो गुन्हा मानला जाईल.

     कलम 354 ड : पाठलाग करणे

    जर कोणताही पुरुष एखाद्या महिलेचा पाठलाग किंवा संपर्क करतो, किंवा महिलेकडून अनिच्छेच्या स्पष्ट संकेतानंतरही वारंवार परस्पर संवाद वाढवण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. महिलेच्या इंटरनेट, ईमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संवादाच्या वापराची निगराणी करतो, याला पाठलागाचा गुन्हा मानले जाईल मात्र अटींसह अशी कृती पाठलागाच्या श्रेणीत गणली जाणार नाही, जर पाठलाग करणाऱ्याने हे सिद्ध केले की, त्याने हे गुन्हा रोखण्यासाठी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी केले आहे आणि पाठलाग करणाऱ्या व्यक्तीवर राज्याद्वारे गुन्हा थांबवणे आणि शोधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.  हे कोणताही कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीद्वारे लावलेली अट किंवा गरजेचे पालन करण्यासाठी केले होते.

    विशेष परिस्थितींमध्ये अशी कृती योग्य आणि न्यायसंगत मानली जाईल. पाठलाग करण्याच्या गुन्ह्यातील दोषीला 5 वर्षे कारावासासह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
    याशिवाय कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीपासून महिलांच्या संरक्षणासाठी खास विशाखा कायदा आणि विशाखा समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. या विशाखा कायद्यानुसारही वरीलप्रमाणेच तरतुदी आहेत, यात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीच्या व्याख्येत पुढील बाबींचा समावेश आहे.

    शारीरिक स्पर्श किंवा प्रस्ताव

    लैंगिक सुखाची मागणी किंवा विनंती करणे लैंगिक टिप्पणी, अश्लीलता दाखवणे, लैंगिक आचरण असलेली शारीरिक, शाब्दिक किंवा मौन कृती करणे,

     विशाखा कायद्यात खोट्या तक्रारीविरोधातही संरक्षण

    तक्रारदाराने दिलेली तक्रार खोटी असल्याचे किंवा आकसाने दिल्याचे, पुरावे खोटे दिल्याचे सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई होऊ शकते. मात्र, केवळ तक्रारदार सिद्ध करू शकला नाही, म्हणजे ती खोटी आहे, असे समजण्यात येऊ नये अशीही तरतूद विशाखा कायद्यात आहे.

    Jitendra Awhad runs to Thane court to avoid arrest

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!