• Download App
    जितेंद्र आव्हाड म्हणतात, 'खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!', कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण । Jitendra Awhad Poem On CM Uddhav Thackeray

    जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’, कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण

    Jitendra Awhad Poem : महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’या शीर्षकाने कविता लिहिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी कवितेच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले आहे. या कवितेत आव्हाडांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलाय. विरोधकांच्या प्रश्नांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे मौन असले तरी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी मात्र त्यांच्यावतीने उत्तर दिल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. Jitendra Awhad Poem On CM Uddhav Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’या शीर्षकाने कविता लिहिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी कवितेच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले आहे. या कवितेत आव्हाडांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलाय. विरोधकांच्या प्रश्नांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे मौन असले तरी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी मात्र त्यांच्यावतीने उत्तर दिल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे.

    या कवितेत मंत्री आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. राज्यातील भाजप नेत्यांवरही त्यांनी या माध्यमातून टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही कविता त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाली आहे.

     

    खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

    कधी थाळ्या वाजवायला
    लावल्या नाही…
    ना कधी मेणबत्या आणि दिवे
    लावायला लावले …..
    निर्णय घेताना घेतले
    विश्वासात…..
    विरोधकांचे त्यामुळेच
    फावले…….
    शांत राहून तो लढत आहे
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    मंदिर उघडा, बाजार उघडा
    शाळा उघडा ते म्हणाले…..
    परीक्षा पुढे ढकलल्या तर
    ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
    कोरोना वाढला तर ते आता
    फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    इमान तर विकले नाहीच
    ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
    कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
    खोट्याने न कधी माना झुकल्या….
    घरी पत्नी आणि मुलगा
    आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    ना कुठे बडबोले पणा
    ना कशाचा बडेजाव..
    आठ हजार कोटीचे
    विमान नको….
    ना कोणत्या प्रकरणात
    घुमजाव……
    जे करतोय ते प्रामाणिक पणे
    तो करतो आहे…..
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
    विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
    गोर गरीब जनतेला
    एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
    निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
    शेतकऱ्यांच्या अडचणी
    साठी तो शांततेत लढतो आहे ……
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!
    ना क्लीन चिट देता आली…
    ना खोटी आकडे वारी देता आली…
    निवडणूक काळात तर कधी
    ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
    जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    महाराष्ट्राचे मीठ खाऊन
    निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
    उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
    ते टीका सरकार वर करताय…..
    तो मात्र टिकेला उत्तर न देता
    सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
    विरोधकांचे खरंच राईट आहे….
    खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
    – डॉ.जितेंद्र आव्हाड

    Jitendra Awhad Poem On CM Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप