Thursday, 8 May 2025
  • Download App
    Jitendra Avhads बलात्कार प्रकरण मिटवायाचा आव्हाडांचा

    Jitendra Avhads : बलात्कार प्रकरण मिटवायाचा आव्हाडांचा प्रयत्न, मनसेची चौकशीची मागणी

    Jitendra Avhads Efforts

    Jitendra Avhads Efforts

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एका धनदांडग्यांनाचे बलात्काराचे प्रकरण शरद पवार यांचे नाव घेऊन मिटविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhads ) करत असल्याची धक्कादायक क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संदीप देशपांडे यांनी केली आहे.

    देशपांडे म्हणाले प्रसार माध्यमांवर काल ही क्लिप वायरल झाली होती. जर एखाद्या शिपायाने बलात्कार केला तर ते माफ करण्याजोगे नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे पण श्रीमंत माणसाने बलात्कार केला तर त्या माणसाला प्रकरणा दाबता येते का?ही जुनी व्हायरल क्लिप असू शकते. कारण सगळ्या मोठ्या नेत्यांची नावे घेतली आहेतहे प्रकरण गंभीर आहे हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचे नाव घेतले आहे, हा कोण आहे याची चौकशी व्हावी पूर्णपणे पडताळणी केली पाहिजे आणि संपूर्ण प्रकरण जगासमोर आले पाहिजे



    या व्हायरल क्लिपची पूर्णपणे पडताळणी पोलिसांनी केली पाहिजे. कोण मुलगी आहे, कोणी केलं वैगरे पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी याची चौकशी करण्याची मागणी करावी, असे देशपांडे म्हणाले.

    या प्रकरणाची माहिती अशी की कॅसेट किंग गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सीरीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. टी सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

    या महिलेने आरोप केले होते की टी सिरीजच्या आगामी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी माझ्यावर 2017 पासून 2020 पर्यंत वेळोवेळी बलात्कार केले. तसंच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मलिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला जितेंद्र आव्हाड धमकी देत आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की हे प्रकरण शरद पवारांकडे गेले आहे.

    Jitendra Avhads Efforts to settle the rape case, MNS demands inquiry

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस