विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने ५.८३ करोडचा टप्पा पार केला.Jhimma: Rs 6 crore grossed in two weeks at the box office
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामरीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली सगळी चित्रपटगृहे सुरु झाली आहे. दरम्यान यावर्षी अनेक नवनवीन बॉलिवूड चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाले असून यात मराठी चित्रपट झिम्मादेखील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.झिम्मा या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांमध्ये सहा कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून दोन आठवडे या चित्रपटाचे शो ‘हाऊसफुल्ल’ ठरले.
दोन आठवड्यांपासून या चित्रपटाचे शो हाऊसफूल सुरु आहे. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने ५.८३ करोडचा टप्पा पार केला. लॉकडाउननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे.चित्रपटाचे छायाचित्रण, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली.
‘झिम्मा’ या चित्रपटाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून दिग्दर्शन हेमंत ढोमने केलं आहे.तसेच या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘झिम्मा’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की , ” सर्वप्रथम ‘झिम्मा’ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.