• Download App
    मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच जितेंद्र आव्हाडांचा संताप; दिली मुंब्रा बंदची धमकी!!Jeetendra Awhad's fury as Mumbra connection of conversion from mobile game Jihad comes out

    मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच जितेंद्र आव्हाडांचा संताप; दिली मुंब्रा बंदची धमकी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भडकले आणि त्यांनी थेट मुंब्रा बंदची धमकी दिली. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये एका जैन मुलाच्या धर्मांतराची केस समोर आल्यानंतर काही धक्कादायक खुलासे उत्तर प्रदेश पोलिसांनी केले. Jeetendra Awhad’s fury as Mumbra connection of conversion from mobile game Jihad comes out

    मोबाईल गेम जिहाद मधून हिंदू मुलांचे धर्मांतर करण्याचा मामला समोर आला. या प्रकारात उत्तर प्रदेशातल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली. त्या आरोपीच्या तपास आणि चौकशी त्याने तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा दावा केला आणि मुख्य आरोपी मुंब्राचा असल्याचे सांगितले.

    यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याची माहिती तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ही माहिती देताना त्यांनी जो 400 मुलांचे धर्मांतर हा आकडा सांगितला आणि त्यातही मुंब्रा कनेक्शन सांगितले, त्यामुळे जितेंद्र आव्हाड भडकले. कारण जितेंद्र आव्हाड हे मुंब्राचे आमदार आहेत त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर महाराष्ट्राला आणि मुंब्रा गावाला बदनाम करण्याचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी 400 च काय, पण 4 मुले धर्मांतरित झाल्याचे दाखवा मी आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा दिला. यावेळी त्यांनी काही अपशब्द वापरले. त्यापुढे जाऊन त्यांनी एक जुलै रोजी मुंब्रा बंद करून दाखवू, अशी धमकी दिली.

    ही मूळ केस अशी :

    धक्कादायक : गाझियाबाद – मुंब्रा कनेक्शन; मोबाईल गेम जिहादमधून एकट्या मुंब्रातून तब्बल 400 मुलांचे धर्मांतर!!

    ठाणे : लव्ह जिहाद पाठोपाठ आता मोबाईल जिहादचे भयानक रूप समोर आले आहे. गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन मधून एक दोन नव्हे तर तब्बल 400 मुलांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डीसीपी निपुण अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात तब्बल 400 मुलांचे धर्मांतर एकट्या मुंब्रात झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भातली माहितीही छाननी पोलीस करत असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

    या संदर्भातील माहिती अशी :

    एक 17 वर्षीय जैन मुलगा बेपत्ता झाला. नंतर तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथल्या मशिदीत नमाज पढत असताना सापडला. झाकीर नाईकच्या प्रभावाने धर्मांतराचा विचार केल्याचे त्याने कबूल केले. या मुलाच्या वडिलांनी इमाम आणि अन्य एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

    मात्र या तक्रारीतून मोबाईल गेम जिहादचा एक गंभीर प्रकार समोर आला. त्यात मस्जिद समितीच्या एका माजी सदस्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गाझियाबाद मधलाच रहिवासी आहे, तर त्याचा साथीदार ठाणे मुंब्रा इथला रहिवासी असून त्याचे खरे नाव शहानवाज मकसूद खान असे आहे. तो बड्डो या बनावट नावाने मोबाईल गेमच्या खेळात अल्पवयीन मुलांना अडकवायचा डाव खेळत असे. याच शहानवाज मकसूद खान याने मुंब्रा परिसरात 400 मुलांचे धर्मांतर केल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी यांनी पोलिसांना दिली. पोलीस या माहितीची छाननी करत आहेत.

    मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकरणातला मुख्य आरोपी शहानवाज मकसूद खान हा मुंब्रा परिसरातून फरार झाला आहे. 1 जून रोजी त्याने आपले कुटुंब सोलापूरला हलविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर तो गायब झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे डीसीपी निपूण अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

    धर्मांतराची मोडस ऑपरेंडी

    फोर्टनाइट सारख्या गेमिंग एप्सवर सक्रिय असलेली एक टोळी हिंदू मुलांचे ब्रेनवॉश करते आणि त्यांना गेम जिंकण्यासाठी कुराणाचे श्लोक वाचायला लावते, असे गाजियाबाद पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

    यात पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी देखील स्पष्ट केली आहे. बनावट नावाने गेमिंग ॲप तयार करून अल्पवयीन मुलांना टॅप केले जायचे. ते जिंकले तर त्यांना बक्षीस आणि हरले तर त्यांना कुराणाच्या आयाती पढवल्या जायच्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात त्यांना इस्लामची माहिती दिली जायची आणि त्यानंतर झाकीर नाईकची इस्लामी प्रचाराची भाषणे ऐकवली जायची. यातून मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करायला लावायचे हा डाव होता.

    गाजियाबाद मध्ये अटक केलेला अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी हा मशिद कमिटीचा सदस्य होता. परंतु त्याला नंतर त्या सदस्य पदावरून बाजूला करून इस्लामच्या प्रचारासाठी मोकळे सोडण्यात आले होते. त्याची आणि ठाणे – मुंबऱ्यातील शहानवाज मकसूद खान याची ओळख झाली आणि त्यांनी वेगवेगळे मोबाईल गेम्स सापळे रचले. त्यात एक जैन मुलगा अडकला. त्या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा मोबाईल गेम जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

    यातूनच मुंब्रा परिसरात एक दोन नव्हे, तर तब्बल 400 जणांचे धर्मांतर केल्याची कबुली अब्दुल रहमान अन्सारी उर्फ नन्नी याने दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ लव्ह जिहादच नव्हे, तर मोबाईल गेम जिहाद किती भयानक पद्धतीने सक्रिय आहे हे स्पष्ट झाले आहे.

    या केस वरूनच जितेंद्र आव्हाड भडकले मुंब्रा कनेक्शन समोर येतात त्यांनी 1 जुलैला मुंब्रा बंद करण्याची धमकीही दिली.

    Jeetendra Awhad’s fury as Mumbra connection of conversion from mobile game Jihad comes out

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस