राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी राज्याच्या मंत्रीमंडळात आपणच दादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच दाखवून देत असतात. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या फाईल्स मंजूर झाल्यावर पुन्हा वित्त विभागाकडे मागविल्या जातात. अजितदादांवरचा हा राग जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर काढला. मंत्रीमंडळाच्या बैठकीतच ते कुंटे यांच्यावर संतापले.Jayant Patil’s Ajitdada’s anger on the Chief Secretary
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी राज्याच्या मंत्रीमंडळात आपणच दादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच दाखवून देत असतात. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या फाईल्स मंजूर झाल्यावर पुन्हा वित्त विभागाकडे मागविल्या जातात.
अजितदादांवरचा हा राग जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर काढला. मंत्रीमंडळाच्या बैठकीतच ते कुंटे यांच्यावर संतापले.
जलसंपदा विभागाच्या विविध कामांच्या मंजूर फाईल्स पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्या जातात. यावरून जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चांगलेच धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढले.
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले.
पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून
फाईल मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी त्या पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज झाले. याबाबत त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच कुंटे यांच्याकडे विचारणा करीत संताप व्यक्त केला.
मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले होते. तरीही ती फाइल वित्त विभागाकडे का पाठवली अशी विचारणा करीत जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांबद्दल नाराजी व्यक्त केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या कामांबद्दल असे होत असेल तर मंत्रिमंडळाच्या वर कोण आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर कोणती फाइल ते पाहून सांगता येईल असे सांगत कुंटे यांनी पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर याबाबत आपण माझ्याकडे या, मार्ग काढू असे पाटील यांना सांगत मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकला.
मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. अर्थ मंत्री असलेले अजित पवार सर्वच मंत्रालयांना आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सगळ्याच विभागाच्या फाईल ते मागवितात.
जलसंपदा विभागावर त्यांचे विशेष प्रेम असल्याने त्यांचे लक्ष जास्त असते. त्यामुळे जयंत पाटील वैतागले असल्याचे बोलले जाते. त्यांचा सगळा राग मंत्रीमंडळाच्या बैठकीत कुंटे यांच्यावर बाहेर पडला.
कुंटे यांच्यावर चिडले असले तरी त्यांना सुनावायचे अजितदादांनाच होते. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या कामांबद्दल असे होत असेल तर मंत्रिमंडळाच्या वर कोण आहे का? असा सवाल त्यांनी केला.
Jayant Patil’s Ajitdada’s anger on the Chief Secretary
महत्त्वाच्या बातम्या
- प्राणवायू एअरलिफ्ट, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हवाई दलाचे २१ दिवसांत १४०० तास उड्डाण
- आरोग्याच्या पायाभूत सुविधांत पुणे प्रथम क्रमांकावर तर दिल्ली- एनसीआर अगदी तळाला, अमेरिकन कंपनीच्या सर्व्हेक्षणात स्पष्ट
- सकारात्मक ! भारत छोड़ो आंदोलनातील प्रख्यात गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी दोरेस्वामी यांची कोरोनावर मात ; वय वर्ष १०३