प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा हवाला देऊन शरद पवार हे आजही भाजपबरोबरच आहेत. हे तुम्हाला लवकरच समजेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याला एक वेगळा दुजोरा दिला आहे. Jayant patil supported prakash Ambedkar statement on sharad Pawar is with BJP even today
अजितदादा हे फडणवीसांबरोबर झालेल्या आपल्या शपथविधी बद्दल कुठे बोलले असतील असे वाटत नाही. पण फडणवीस – अजितदादांचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. ती उठण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे कदाचित शरद पवारांनी फडणवीसांबरोबर शपथ घेण्यासाठी अजितदादांना पाठवले असावे. त्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली. अजितदादा शपथविधीनंतर 72 तासात परत आले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा मार्ग मोकळा झाला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेला सत्तेची गरज नव्हती. सत्तेची गरज काँग्रेस – राष्ट्रवादीला होती या प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जयंत पाटलांनी इन्कार केला. पण प्रकाश आंबेडकर हे जर खरंच भाजप विरोधी असतील तर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला पाहिजे, असे वक्तव्य ही जयंत पाटलांनी केले आहे.
मात्र फडणवीस – अजितदादा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचे वक्तव्य करून जयंत पाटलांनी एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांच्या मूळ वक्तव्याला दुजोरा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून राष्ट्रवादीत आजही सर्वकाही अलबेल नसल्याचे चिन्ह दिसले आहे.
Jayant patil supported prakash Ambedkar statement on sharad Pawar is with BJP even today
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत वीजदर 18 % वाढविण्याचा बेस्टचा प्रस्ताव; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार स्वीकारणार??
- नोकरीची संधी : CISF मध्ये 451 पदांची भरती; करा अर्ज
- बीबीसी मोदी डॉक्युमेंटरी : ब्रिटिश सरकारकडून निषेध; भारतात बंदी तरीही काँग्रेस, जेएनयु, हैदराबाद विद्यापीठात स्क्रीनिंग