नाशिक : विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.
– रोहित पवारांची राजकीय मुशाफिरी
भाजप, सुनेत्रा पवार, अजित पवारांची मुले, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या सगळ्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बासनात गुंडाळून ठेवल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय घातपात ठरविण्यासाठी जंग जंग पछाडले. त्यांनी दिल्लीत जाऊन मोठी राजकीय मुशाफिरी करून घेतली. त्यांनी भाजप बरोबरच तेलगु देशम पक्षातल्या नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यामुळे विलीनीकरणाचा विषय कायमचा गुंडाळला गेला. अर्थात त्याचा तोटा रोहित पवारांच्या बरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना सुद्धा सहन करावा लागला. त्यांना भाजपच्या सत्तेच्या तुकड्याचा लाभ झाला नाही.
विलीनीकरणाच्या विषयाला उकळी
त्यामुळेच आज जयंत पाटलांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीतून विलीनीकरणाच्या विषयाला पुन्हा उकळी दिली. अजित पवारांबरोबर 17 जानेवारीची बैठक झाली. त्याआधी 16 जानेवारीला माझ्या घरी बैठक झाली. त्यावेळी बारामतीला जाऊन पवार साहेबांना सगळे सांगायचे ठरले, की माझे 40 आमदार मी सांगेन ते ऐकतील, असे अजित पवार म्हणाले होते. मी त्यांच्याबरोबर सत्तेत सोबत यावे, असे अजित पवारांना वाटत होते. त्यांची तशी तीव्र इच्छा होती. पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख जाहीर करण्याचा आदल्या दिवशी कसा काय अपघात झाला??, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला. या सवालातून त्यांनी भाजप आणि सुनेत्रा पवार यांना संशयाच्या कटघऱ्यात उभे केले.
सत्तेच्या वळचणीला जायची तडफड
पण या मुलाखतीतून जयंत पाटलांची भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तीव्र इच्छाच दिसून आली. त्या पलीकडे या मुलाखतीतून कुठलेही राजकीय सत्य बाहेर आले नाही. कारण जयंत पाटलांनी बरोबर झालेल्या बैठकांमध्ये कुठलेही वेगळे सत्य बाहेर काढले नाही. आत्तापर्यंत अनेकांनी बोलून दाखविलेल्या राजकीय गोष्टींनाच त्यांनी या मुलाखतीतून उकळी दिली.
Jayant Patil reignites the issue of the merger.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झालेत, संघाला असा पंतप्रधान कसा काय चालतो??; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
- देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या; एकूण शाखांची संख्या ८८ हजार ९४९ वर!!
- Trump : ट्रम्प यांच्याकडे युद्ध संपवण्याची कोणतीही योजना नाही; इराणच्या ताकदीचा चुकीचा अंदाज लावला
- NCERT : NCERT नववी इंग्रजीची 2 पुस्तके एकत्र करून एक केले; भारतीय लेखकांच्या रचनांना अधिक स्थान