• Download App
    विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील पडले; स्ट्रॅटेजी चुकल्याची पवारांची कबुली!! Jayant Patil lost in Legislative Council elections; Pawar's admission that the strategy was wrong

    विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील पडले; स्ट्रॅटेजी चुकल्याची पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पडले. ते शरद पवारांच्या भरवशावर आणि पाठिंब्याने निवडणुकीत उभे होते. जयंत पाटलांना पवारांना निवडून आणता आले नाही. या पार्शभूमीवर आपली स्ट्रॅटेजी चुकल्याची कबुली शरद पवारांनी पुण्यातल्या वार्तालापत दिली. Jayant Patil lost in Legislative Council elections; Pawar’s admission that the strategy was wrong

    जयंत पाटलांना महाविकास आघाडीतूनच दगाफटका झाला का??,यावरुन बरेच तर्क-वितर्क सुरु असताना स्वत: शरद पवार यांनी स्ट्रॅटेजी चुकल्याची कबुली दिली.

    शरद पवार म्हणाले :

    – जयंत पाटील यांच्याबाबत एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता. माझ्या पक्षाची 12 मते होती. आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असं वाटलं. त्याला कारण होतं. लोकसभेच्या निवडणुकीत तिघे एकत्र लढलो. ती लढत असताना सीपीआय, सीपीएम, शेकाप सोबत होते. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या. ते देण्याच्या स्थितीत नव्हतो. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि मी एकत्र बसलो. तेव्हा त्यांना सांगितलं की, डाव्यांना आता काही देऊ शकत नाही. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू. सर्वांनी मान्य केलं. तिघे एकत्र लढलो. लोकसभेत यश मिळालं. मनात होतं की संधी आली तर जागांचा विचार करावा.

    नेमकी स्ट्रॅटेजी चुकली कुठे??

    काँग्रेसकडे मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेनेकडे थोडीच जास्त होती, पण ती पुरेशी नव्हती. त्यांनी उमेदवार दिला. त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण त्यात मतभिन्नता होती. काँग्रेसकडे 37, आमच्याकडे 12 आणि शिवसेनेकडे 16 मते होती.

    – काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. निवडून येण्यासाठी सर्व मते तुम्ही घ्या. दोन नंबरची मते 50 % मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्या. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेंच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला असं हवं होतं. हे माझं गणित होतं. त्यामुळे आमचे उमेदवार जयंत पाटील निवडून आले असते. हे गणित मान्य झालं नाही. पण त्यामुळे जयंत पाटील पडले. अर्थात यात कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे पडले.

    Jayant Patil lost in Legislative Council elections; Pawar’s admission that the strategy was wrong

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस