• Download App
    Script 5 : राष्ट्रवादीत महाराष्ट्रापुरते सिंडिकेट - इंडिकेट!!; जयंत पाटील पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष!! Jayant Patil is the state president of Pawar group, Sunil Tatkare is the state president of Ajitdada group

    Script 5 : राष्ट्रवादीत महाराष्ट्रापुरते सिंडिकेट – इंडिकेट!!; जयंत पाटील पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, सुनील तटकरे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीतल्या संघर्षाची स्क्रिप्ट आज दुपारनंतर आणखी पुढे सरकली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र पुरते सिंडिकेट – इंडिकेट गट पडले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांसह 9 मंत्र्यांवर अपात्रतेची तलवार टांगल्याबरोबर अजित पवार गटाने आज त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरूनच उचल बांगडी करून त्यांच्या जागी आपल्या गटाचे सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. Jayant Patil is the state president of Pawar group, Sunil Tatkare is the state president of Ajitdada group

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी नेमलेले कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या अधिकारात सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. या निमित्ताने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सिंडिकेट आणि इंडिकेट तयार झाले असून शरदनिष्ठ गट विरुद्ध अजितनिष्ठ गट असे दोन गट आता पुढे सरसावले आहेत.

    एकीकडे शरद पवारांनी कराडच्या प्रीतीसंगमांवर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. ते राष्ट्रवादीच्या कायदेशीर लढाईकडे लक्ष देणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत. पण जयंत पाटलांनी मात्र राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांवर अपात्रतेची तलवार टांगून त्यांना कायदेशीर लढाईत उतरवले आहे. त्यामुळे अजित पवारांनी देखील आपली तलवार परजून जयंत पाटलांनाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केले आहे.


    राष्ट्रवादीत फूट पडल्याने विरोधकांना मोठा धक्का… सोनिया, ममता आणि नितीश यांची फोनवर शरद पवारांशी चर्चा


    जयंत पाटलांची मुदतच मुळात संपली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला बजावलेली नोटीसच बेकायदेशीर आहे, असा पवित्र अजितदादांनी घेतला आणि राष्ट्रवादीचे शरद पवारांनी नेमलेले कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या अधिकारात जयंत पाटलांना बाजूला सारून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या खजिनदारपदी नेमलेले सुनील खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

    राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची 5 जुलै रोजी बैठक आहे. हीच बैठक आपल्या राष्ट्रवादीचे आहे, असा दावा अजित पवारांनी केला आहे. त्याचबरोबर ज्याच्याकडे आमदार जास्त, खासदार जास्त, लोकप्रतिनिधी जास्त त्याचा पक्ष असा दावा करून अजित पवारांनी शरद पवारांनी नेमलेला विरोधी पक्ष नेता आणि पक्षप्रतोद हेच बेकायदा आहेत. कारण दोन पदांवर एक व्यक्ती नेमताच येत नाही, असे सांगून जितेंद्र आव्हाड यांची ती नियुक्ती फेटाळून लावली आहे.

    या अर्थाने राष्ट्रवादीत महाराष्ट्रापुरत्या सिंडिकेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिकेट राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन काँग्रेस तयार झाल्या आहेत.

    1969 सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट काँग्रेस

    1969 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून इंदिरा गांधी विरुद्ध कामराज, निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, स. का. पाटील यांची राजकीय लढाई झाली. त्यावेळी इंदिरा गांधींची इंडिकेट काँग्रेस आणि कामराज यांची सिंडिकेट काँग्रेस अशी बंगलोर मध्ये फूट पडली. त्यानंतर दोन काँग्रेसची वेगवेगळी अधिवेशनेही झाली. यात सिंडिकेट काँग्रेसचे निजलिंगप्पा अध्यक्ष होते, तर इंडिकेट काँग्रेसचे अध्यक्ष पद इंदिरा गांधींनी जगजीवन रामांना दिले होते. दोन्ही काँग्रेसमध्ये त्यावेळी उभा संघर्ष झाला. अखंड काँग्रेसचे खासदार दोन काँग्रेसमध्ये विभागले गेले आणि हा संघर्ष 1971 आणि 1977 च्या निवडणुकीत कायम राहिला होता.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अशाच पद्धतीने आता शरदनिष्ठ सिंडिकेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजितनिष्ठ इंडिकेट राष्ट्रवादी काँग्रेस अशी फूट पडली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गोठण्याच्या दिशेने सुरुवात झाली असून राष्ट्रवादीत नेते ते कार्यकर्ते अशी उभी फूट पडत आहे.

    Jayant Patil is the state president of Pawar group, Sunil Tatkare is the state president of Ajitdada group

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा