• Download App
    पवारांच्या निवृत्ती नाट्यातही सर्व काही आलबेल नाही; राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीची जयंत पाटलांना माहितीच नाही!!|Jayant patil didn't know about very important meeting of NCP, indicates unrest in the party

    पवारांच्या निवृत्ती नाट्यातही सर्व काही आलबेल नाही; राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीची जयंत पाटलांना माहितीच नाही!!

    प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी निवृत्तीची तयारी दाखविल्यानंतर ज्या महाघडामोडी घडत आहेत, त्यामध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. आज सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस स्वतः शरद पवार उपस्थित होते, पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. ते पुण्यात साखर आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीसाठी साखर संकुलात उपस्थित होते.Jayant patil didn’t know about very important meeting of NCP, indicates unrest in the party



    यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या बैठकीत स्वतः शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. पण जयंत पाटलांना या बैठकीची कल्पनाच नव्हती. त्यामुळे ते तिथे हजर नव्हते. स्वतः शरद पवारांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयंत पाटलांना फोन लावल्याचे सांगण्यात येते. पण त्यावेळी जयंत पाटील पुण्यात साखर आयुक्तालयात होते. आपल्याला या बैठकीचे कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे आपण तिथे उपस्थित नव्हतो. शिवाय साखर आयुक्त बरोबर नियोजित बैठक असल्यामुळे आपण पुण्याला निघून आलो. या बैठकीनंतर आपण परत मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती जयंत पाटलांनी पत्रकारांना दिली.

    पवारांच्या निवृत्ती नाट्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढ्या मोठ्या घटना घडल्यामुळे घडत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्षच अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित नाहीत, या बातमीमुळे राष्ट्रवादीत पवारांनी निवृत्ती नाट्य घडवूनही सर्व काही आलबेल नाही याचेच संकेत मिळाले.

    Jayant patil didn’t know about very important meeting of NCP, indicates unrest in the party

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!