• Download App
    जयंत पाटील म्हणतात, पवार द्रष्टे नेते, ते 2034 च्या निवडणुकीचा विचार करतात, पण आत्ताची फूट त्यांच्या नकळत घडली!! Jayant patil claims, sharad pawar very foresighted leader

    जयंत पाटील म्हणतात, पवार द्रष्टे नेते, ते 2034 च्या निवडणुकीचा विचार करतात, पण आत्ताची फूट त्यांच्या नकळत घडली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवार द्रष्टे नेते आहेत. आपण जेव्हा 2024 च्या निवडणुकांचा विचार करतो, त्यावेळी ते 2034 च्या निवडणुकीच्या विचार करतात. पण आत्ताची राष्ट्रवादीतली फूट त्यांच्या नकळत घडली, असे परस्पर विरोधी वक्तव्य शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटलांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत जयंत पाटलांनी अशी अनेक परस्पर विरोधी वक्तव्ये केली. Jayant patil claims, sharad pawar very foresighted leader, but didn’t know about the split in NCP!!

    जयंत पाटील म्हणाले :

    शरद पवारांचे वय झाले असे सगळेजण बोलतात. परंतु त्यांचा ब्रेन अधिक काम करतो. राजकारणातल्या गोष्टी आपल्यापेक्षा त्यांना चटकन समजतात. आपण सर्वजण 2024 च्या निवडणुकीचा विचार करत असताना शरद पवार मात्र 2034 च्या निवडणुकीचा विचार करतात.

    राष्ट्रवादी काँग्रेसला 25 वर्षे होत असताना पक्षात फूट पडली. हे शरद पवारांच्या नकळत घडले. याचा मी साक्षीदार आहे. आपण भाजपबरोबर जायला पाहिजे, असे सांगणारा पक्षात एक गट होताच. पण शरद पवार त्यांना होकार देत नव्हते. फारच दबाव आला की, शरद पवार बघा. इतरांशी बोला, असे सांगून वेळ मारून न्यायचे. भाजप सोबत जाण्याचे त्यांच्या मनात कधीही नव्हते. त्यामुळे फुटीची जी काही घटना घडली, ती अचानक घडली. ती शरद पवारांच्या नकळत घडली. शरद पवारांना फुटीची बिलकूल कल्पना नव्हती.

    पहिल्यांदा हे घडले तेव्हा 8 – 9 आमदार तिकडे गेले. त्यांना वाटले फक्त प्रदेशाध्यक्ष बदलायचा आहे. मला अनेकांचे फोन आले तेव्हा मी म्हणालो, तुम्ही जा. आज त्यातले 2 – 3 जण मंत्री आहेत. पण पवारांना या फुटीची बिलबुल कल्पना नव्हती.

    शरद पवारांनी स्क्रिप्ट लिहिली असती तर निवडणूक आयोगापर्यंत विषयच पोहोचला नसता. पण निवडणूक आयोगात पक्ष आपल्या हातातून निसटतोय हे पवारांना पाहावे लागते आहे. आपण ज्या पक्षाला जन्म दिला, तो पक्ष आपल्या हातून हिसकावला जातोय हे ते उघड्या डोळ्यांनी दिल्लीत बघताहेत. पक्ष फुटीची घटना त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगात 3 – 3 तास बसून सुनावणीत भाग घेतात. शरद पवारांना निवडणूक आयोगाच्या दारात जायला लावणे अभिप्रेत नव्हते.

    शरद पवार हेच INDI आघाडीचे केंद्रबिंदू आहेत. शरद पवार काहीही करू शकतात, हे आघाडीतल्या नेत्यांना माहिती आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस हे देखील पडती भूमिका घेऊन सर्व लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच गोष्टी पुढे घडणार आहेत अनेक पूलांकडून पाणी वाहून जायचे आहे.

    Jayant patil claims, sharad pawar very foresighted leader, but didn’t know about the split in NCP!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!