• Download App
    जयंत पाटलांनी केला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा; मुख्यमंत्रीपद सोडा, विरोधी पक्ष नेतेपद पण जाईल, बच्चू कडूंनी उडवली गटबाजी वरून खिल्ली!!|Jayant patil claimed for NCP chief ministership, but bacchu kadu targets NCP's factionalism

    जयंत पाटलांनी केला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा; मुख्यमंत्रीपद सोडा, विरोधी पक्ष नेतेपद पण जाईल, बच्चू कडूंनी उडवली गटबाजी वरून खिल्ली!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठे यश मिळाल्याचा दावा करत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी थेट राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे, तर राष्ट्रवादीतील गटबाजी वर बोट ठेवत मुख्यमंत्रीपद सोडा विरोधी पक्षनेतेपद जाईल, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी जयंत पाटलांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.Jayant patil claimed for NCP chief ministership, but bacchu kadu targets NCP’s factionalism

    महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला फार मोठे यश मिळल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, तसेच काही मराठी माध्यमे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आता एक नंबरचा पक्ष होईल. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा दावा कराड मधल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला आहे.



    अर्थातच त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा पुन्हा जोरावर आली आहे. अजित पवारांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखविल्यानंतर त्या चर्चेला जोर चढलाच होता. पण त्यानंतर राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरू शकतील, असे वक्तव्य करून जयंत पाटलांची हॅट मुख्यमंत्री पदाच्या रिंग मध्ये टाकून ठेवली. आज जयंत पाटलांनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदापेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल असा दावा करून त्या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा हवा दिली.

    याच मुद्द्यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी करून घेतला त्यावेळी पासून संशय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मूळातच आता अजित पवार आणि जयंत पाटील यांचे दोन गट मजबूत झाले आहेत. ते सांभाळण्याचे आव्हान शरद पवारांपुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडाच विरोधी पक्ष नेतेपद टिकले पाहिजे. त्यासाठी आमच्या राष्ट्रवादीला शुभेच्छा आहेत, असे खोचक उद्गार बच्चू कडू यांनी काढले आहेत.

    Jayant patil claimed for NCP chief ministership, but bacchu kadu targets NCP’s factionalism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस