विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. Jayant Patil
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील अनेक चुका दाखवल्या. त्यावर त्यांनी सीओ यांनी आम्हाला हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याची ग्वाही दिली. तसेच या याद्या दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकरक सुरू करण्याचे आश्वासनही दिले. Jayant Patil
आम्ही निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवले. त्या पुराव्याच्या सहीत आम्ही त्यांना काही माहिती दिली. याशिवाय आम्ही एक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात मतदार यादीमधील मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मतदार यादीत पत्ता व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचेही आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
Jayant Patil claims – Each voter has the right to vote 8 times; Allegations that someone else is operating the Commission’s servers
महत्वाच्या बातम्या
- उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिंदे सेनेचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला शह; दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश
- Madagascar : आता मादागास्करमध्ये GenZ कडून सत्तापालट; राष्ट्रपती लष्करी विमानातून फ्रान्सला पळून गेल्याचा दावा
- Bihar Elections, : बिहारमध्ये काँग्रेसची 243 जागा लढवण्याची तयारी; दिल्लीत खरगेंच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
- महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे; पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि भावी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!